आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:डाॅलरचे दर घसरल्याने चार दिवसांतच साेने 1200 रुपयांनी‎ वाढले, दाेन दिवस तेजी राहिल्यास ६० हजारांवर पाेहाेचणार‎

जळगाव‎9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डाॅलरचे‎ दर घसरल्याने साेन्याच्या दरात वाढ‎ हाेते. त्याचा परिणाम हाेत गेल्या चार‎ दिवसांत भारतीय सुवर्ण बाजारात‎ साेन्याच्या प्रती ताेळ्याच्या दरात‎ १२०० रुपयांची वाढ नाेंदवली गेली.‎ दरम्यान आगामी दाेन दिवस दरातील‎ ही तेजी कायम राहिल्यास येत्या‎ आठवड्यात साेन्याचे दर ६० हजार‎ रुपयांचा टप्पा पार करण्याचा अंदाज‎ जाणकारांनी व्यक्त केला आहे.‎ साेन्याच्या दरात आंतरराष्ट्रीय‎ चलन डाॅलरच्या मूल्यातील‎ चढउतारासह प्रमुख जागतिक‎ बँकांच्या व्याजाच्या दरासाेबत साेने‎ खरेदी- विक्रीचा परिणाम हाेत‎ असताे. गेल्या आठवड्यापासून‎ डाॅलर्सच्या किमतीत घसरण‎ नाेंदवली जाते आहे. त्याचा परिणाम‎ भारतीय सुवर्ण बाजारपेठेत‎ साेन्याच्या दरात तेजी पाहायला‎ मिळते आहे.

गेल्या आठवड्याच्या‎ सुरुवातीला ५६ हजार रुपये प्रति‎ ताेळा असलेले साेने धुळवडीनंतर‎ बुधवार व गुरुवार या दाेन दिवसांत‎ हजार रुपयांच्या घसरणीनंतर पुन्हा‎ दरात तेजी आली आहे. शुक्रवारी‎ पुन्हा दर पूर्वपदावर (५६००० रुपये‎ ताेळा) येऊन तेजी कायम राहिली.‎ त्यानंतरचे दाेन दिवस पुुन्हा ९००‎ रुपयांची वाढ झाली. साेमवारी‎ खुलत्या बाजारात ५७२०० रुपये प्रति‎ ताेळा दर झाले. चांदीच्या दरात‎ साेन्याच्या तुलनेत गेल्या‎ पंधरवड्यात फारशी वाढ झालेली‎ नाही.

२८ फेब्रुवारी राेजी चांदीचे प्रति‎ किलाेचे दर ६३८०० हाेते. ते ५ मार्च‎ राेजी ६५ हजार रुपयांवर पाेहाेचून‎ दाेनच दिवसांनी तीन हजारांच्या‎ घसरणीसह ६२ हजार रुपयांपर्यंत‎ खाली आले. पुन्हा वाढत जाऊन १३‎ मार्च राेजी ६४ हजार २०० रुपये प्रती‎ किलाेवर पाेहाेचले आहेत. म्हणजेच‎ १३ दिवसांत चांदीच्या दरात अवघी‎ ४०० रुपयांची वाढ झाली आहे.‎ साेन्याच्या तुलनेने अत्यल्प आहे.‎

पाडव्यापर्यंत तेजीचे संकेत‎
मार्च आणि एप्रिल महिन्यात माेठ्या‎ लग्नतिथी आहेत. या अनुषंगाने दागिने‎ खरेदीचे प्रमाण वाढले आहे. मार्चच्या‎ तिसऱ्या आठवड्यात गुढीपाडवा आहे.‎ या दिवशीही साेने खरेदी माेठ्या प्रमाणात‎ केली जाते. या पार्श्वभूमीवर पाडव्याला‎ साेने तेजीत राहण्याची शक्यता वर्तवली‎ जाते आहे. चांदीच्या दरात मात्र संथगतीने‎ चढ-उतार सुरू असल्याचे दिसते आहे.‎

तर साेने ६० हजारांवर‎
साेन्याच्या दरात गेल्या‎ आठवड्यात आलेली तेजी‎ आगामी दाेन दिवस कायम‎ राहत दर वाढले तर पुढील‎ आठवड्यात साेन्याचे प्रती‎ ताेळ्याचे दर ६० हजारांचा टप्पा‎ पार करू शकेल. सध्या तरी‎ तसे चित्र दिसते आहे, असा‎ अंदाज साेन्याच्या दराचे‎ अभ्यासक तथा जळगाव‎ सराफ असाेसिएशनचे अध्यक्ष‎ अजय ललवाणी यांनी‎ साेमवारी ‘दिव्य मराठी’शी‎ बाेलताना व्यक्त केला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...