आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपरमून:मंगळवारी चंद्र-पृथ्वीतील अंतर 27,500 किमीने होणार कमी, चंद्र 14 टक्के मोठा व 30 पट जास्त प्रकाशमान दिसणार

जळगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवारी असलेल्या वट पाैर्णिमेला चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर तब्बल 27500 किमीने कमी हाेणार आहे. पृथ्वीजवळ आल्याने मंगळवारी आकाशात ‘सूपरमून’ दिसणार आहे. मंगळवार आणि बुधवार अशा दाेन्ही दिवशी आकाशात ‘सुपरमून’ बघता येणार आहे.

चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर हे ३ लाख ८४ हजार ४०० किमी एवढे आहे. वट पाैर्णिमेला हे अंतर 27900 किमीने कमी हाेवून 3 लाख 56 हजार 500 किमीवर येणार आहे. चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्याने त्याचा आकार तब्बल 14 टक्के माेठा दिसेल. नेहमीपेक्षा चंद्र 30 पट अधिक प्रकाशित दिसेल. याला खगाेलशास्त्रात ‘सुपरमून’ म्हटले जाते. विशेष चंद्राेदय हाेतांना दिसणारा ‘सुपरमून’ डाेळ्याचे पारणे फेडणारा असताे. क्षितीजाजवळ त्याचा आकार,रंग आणि प्रकाश पाहणे हे खगाेलप्रेमीसाठी माेठी पर्वणी असते.

ढगाळ वातावरणामुळे अडचण

14 जुन राेजी आकाशात सायंकाळी 7.16 वाजता चंद्रदय हाेईल. यावेळी क्षितीजावळ चंद्र विलक्षण माेठा आणि प्रकाशामान दिसणार आहे. यावेळेत आकाशात वातावरण ढगाळ असल्यास खगाेलप्रेमींच्या उत्साहावर पाणी फिरू शकते. परंतु पहाटे 6.15 वाजेपर्यंत ही संधी राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 जुन राेजी रात्री 8.25 वाजेनंतर पुन्हा आकाशात सुपरमुन पाहता येणार आहे. दाेन दिवस सुपरमुन पाहण्याची संधी असेल.

दाेन दिवस संधी

ढगाळ वातावरणामुळे मंगळवारी चंद्राेदयावेळी ‘सुुपरमुन’ बघता आली नाही तर रात्रभरात केव्हाही बघता येईल. बुधवारी देखील आकाशात ‘सुपरमून’ दिसेल, असे खगाेल अभ्यासक अमाेघ जाेशी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...