आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सण-उत्सव:निर्बंध हटवल्याने यंदा पाडवा दणक्यात; देश सदैव कोरोनामुक्त आणि निरोगी राहो अशी विद्यार्थ्यांनी केली प्रार्थना

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संस्कार भारतीतर्फे रंगली पाडवा पहाट
‘जीवनात ही घडी अशीच राहू दे... जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ यासह स्वर्गीय लता मंगेशकरांच्या गाजलेल्या अनेक सुरेल गीतांनी शनिवारी महापालिकेच्या प्रांगणात गुढीपाडव्याची पहाट सूरमयी झाली. गुढीपूजन करून उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन नववर्षाची सुरुवात झाली. संस्कार भारतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

‘ओम नमोजी आद्या...’ या संत ज्ञानेश्वरांच्या रचनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘जयोस्तुते श्री महन्मंगले नमस्तुते...’ या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रचनेने समारोप झाला. मध्यंतरात संपदा छापेकर यांनी गायिलेल्या मोगरा फुलला... विठ्ठल तो आला, जीवनात ही घडी अशीच राहू दे... यासह वारा गाई गाणे या गीतांनी कार्यक्रमांची रंगत वाढवली. स्वाती डहाळे यांच्या ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती..., अरे अरे ज्ञाना झालाशी’ या गीतांनी वातावरण मंत्रमुग्ध केले.

‘भय इथले संपत नाही’ हे गीत अथर्व मुंडले यांनी सादर केले. नीळकंठ कासार यांनी ‘रुणझुण रुणझुण रे भ्रमरा’ हे गीत सादर केले. दिलीप चौधरी यांच्या ‘डोलकर दर्याचा राजा’ या गीतानेही प्रेक्षकांना खिळवून ठेवले. राजेंद्र माने यांनी ‘संधी काली या’ हे गीत सादर केले. मजसी ने मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, जयोस्तुते व गुढीच्या सामूहिक गीताने समारोप झाला

बातम्या आणखी आहेत...