आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Due To Removal Of Restrictions, Padva Is In Trouble This Year; The Beginning Of The New Year Is Fragrant With Various Melodic Songs |marathi News

सण-उत्सव:निर्बंध हटवल्याने यंदा पाडवा दणक्यात; कर्णमधुर विविध भावगीतांनी नववर्षाची सुरुवात आल्हाददायक

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीपक तरुण मंडळातर्फे गावगुढीचे पूजन
दीपक तरुण मंडळाच्या गावगुढीचे पूजन श्रीराम मंदिर संस्थानचे श्रीराम महाराज जोशी व आमदार सुरेश भोळे, शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे, दीपक जोशी, प्रभाकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. योगेश वाणी, सागर शिंपी, गौरव शिंदे, योगेश कासार, दीपक तांबट, शुभम सोनार, अनुज शर्मा उपस्थित होते.

संस्कार भारतीतर्फे रंगली पाडवा पहाट
जळगाव | ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे... जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ यासह स्वर्गीय लता मंगेशकरांच्या गाजलेल्या अनेक सुरेल गीतांनी शनिवारी महापालिकेच्या प्रांगणात गुढीपाडव्याची पहाट सूरमयी झाली. गुढीपूजन करून उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन नववर्षाची सुरुवात झाली. संस्कार भारतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

‘ओम नमोजी आद्या...’ या संत ज्ञानेश्वरांच्या रचनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘जयोस्तुते श्री महन्मंगले नमस्तुते...’ या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रचनेने समारोप झाला. मध्यंतरात संपदा छापेकर यांनी गायिलेल्या मोगरा फुलला... विठ्ठल तो आला, जीवनात ही घडी अशीच राहू दे... यासह वारा गाई गाणे या गीतांनी कार्यक्रमांची रंगत वाढवली. स्वाती डहाळे यांच्या ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती..., अरे अरे ज्ञाना झालाशी’ या गीतांनी वातावरण मंत्रमुग्ध केले. ‘भय इथले संपत नाही’ हे गीत अथर्व मुंडले यांनी सादर केले. नीळकंठ कासार यांनी ‘रुणझुण रुणझुण रे भ्रमरा’ हे गीत सादर केले. दिलीप चौधरी यांच्या ‘डोलकर दर्याचा राजा’ या गीतानेही प्रेक्षकांना खिळवून ठेवले. राजेंद्र माने यांनी ‘संधी काली या’ हे गीत सादर केले. मजसी ने मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, जयोस्तुते व गुढीच्या सामूहिक गीताने समारोप झाला. वैदेही नाखरे यांनी निवेदन केले.

कथक कला मंदिराच्या रमा करजगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आज गोकुळात रंग...’ या गीतावर रसिका ढेपे, निधी गायकवाड, विप्रा तळेले, सानिका शेठ, मिताली सपकाळे, समृद्धी ब्राम्हणे, देवश्री पाटील, कुंतल वाघमारे, अनुष्का पोतदार, युक्ता नाईक, श्रावणी बावस्कर यांनी सामूहिक नृत्य सादर केले.

विवेकानंद शाळेत नववर्षानिमित्त अभ्यासविषयक संकल्प
विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळा, वाघनगर येथे गुढीपाडव्यानिमित्त गुढी उभारा या स्वागत गीतावर विद्यार्थिनींनी नृत्य सादर करून केली. इयत्ता दुसरीतील अंशिका चव्हाण या विद्यार्थिनीने मराठी, इंग्रजी महिने, येणारे नवीन वर्ष याबद्दल माहिती दिली. दीपाली कापडणे यांनी गुढीपाडव्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमावर आधारित गोष्ट विद्यार्थ्यांना रिता पवार यांनी सांगितली. विद्यार्थ्यांकडून नववर्षानिमित्त अभ्यासविषयक संकल्प करून घेण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन दीपाली कापडणे यांनी केले. या वेळी मुख्याध्यापक हेमराज पाटील, समन्वयिका जयश्री वंडोळे, शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमस्थळी गुढीपूजन : गुढीपूजन महापौर जयश्री महाजन, ज्येष्ठ साहित्यिक माया धुप्पड, गीता रावतोळे, रेखा लढे, सुनंदा सुर्वे, कल्पना नेवे, रमा करंजगावकर यांनी केले. उपमहापौर कुलभूषण पाटील, अनिल अभ्यंकर, मोहन रावतोळे, डॉ. सुभाष महाले, डॉ. पुरुषोत्तम पाटील, सुहास देशपांडे, किशोर सुर्वे, प्रमोद जोशी, दुश्यंत जोशी यांनी अर्घ्यदान केले. संयुक्ता बयाणी यांनी अर्घ्यमंत्र म्हटले. संस्कार भारतीच्या सदस्यांनी नियोजन केले.
न्यू इंग्लिश स्कूलतर्फे शोभायात्रा

अभिनव विद्यालयात विद्यार्थ्यांचा समाजात जनजागृतीचा संकल्प
जळगाव

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे सण-उत्सवासह विविध गोष्टींवर निर्बंध होते. यंदा कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने शासनाने नियम शिथिल केल्याने जळगावात यंदा गुढीपाडवा दणक्यात साजरा करण्यात आला. पहाटेपासून पाडवा पहाट, गावगुढी पूजनासह विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. शाळांमध्ये कोरोनामुक्तीसाठी गुढी उभारून देश सदैव कोरोनामुक्त आणि निरोगी राहो अशी प्रार्थना विद्यार्थ्यांनी केली.

भाजपतर्फे सुरेल गीतांची मेजवानी
मनपाच्या आवारात गुढी पूजन करताना महापौर जयश्री महाजन. सोबत माया धुप्पड.
नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूलतर्फे गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. विठ्ठल मंदिराजवळ प्रभू श्रीरामचंद्र यांच्या पालखीचे पूजन करण्यात आले. या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, अध्यक्ष जनार्दन माळी, उपाध्यक्ष डॉ. विकास चौधरी, संचालक राजू पाटील, विनायक वाणी, मुख्याध्यापक सी. बी. अहिरे, प्रवीण महाजन उपस्थित होते. सोहळ्यात सजीव आरास करण्यात आली होती. पालकांनी घरासमोर रांगोळी काढून दिंडीचे पूजन केले. कार्यक्रमाचे नियोजन अनिल चौधरी, संगीता जोशी, शिल्पा धर्माधिकारी यांनी केले. त्यांना सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

नशिराबाद येथे शोभायात्रेत सहभागी झ‌ालेले न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी.
माहेश्वरी विद्या प्रसारक मंडळ संचलित अभिनव माध्यमिक विद्यालयात गुढीपाडव्यानिमित्त कोरोनामुक्तीसाठी गुढी उभारण्यात आली. या निमित्ताने देश सदैव कोरोनामुक्त निरोगी राहो, अशी प्रार्थना करण्यात आली. विद्यार्थिनींनी परंपरागत पोशाख परिधान करून कोरोनामुक्तीसाठी समाजात जागरूकता आणण्याचा संकल्प केला. या वेळी मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.

जळगाव | महाराणा प्रताप चौकात शनिवारी पाडवा पहाट कार्यक्रम झाला. यात गायकांनी सादर केलेल्या सुरेल गीतांनी उत्साह वाढवला. भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आमदार सुरेश भोेळे, माजी महापौर सीमा भोळे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी सभापती राजेंद्र घुगे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, नगरसेविका अॅड. शुचिता हाडा, डॉ. विरण खडके, राजेंद्र मराठे, महेश चौधरी, महिला आघाडी अध्यक्ष दीप्ती चिरमाडे यांनी गुढीचे पूजन केले. सप्तसूर कलाकार मनीषा कोल्हे, भूषण खैरनार, अमित सोळूंके, विजय पाटील, वरुण नेवे, सेजल वाणी, मानसी असोदेकर यांनी विविध भावगीत, भक्तिगीते सादर केली. तबला साथ संहिता जोशी, हार्मोनियम भूषण खैरनार, सुयोग गुरव, अमित सोळंके यांनी दिली. सूत्रसंचालन शुभदा नेवे यांनी केले. मनोज भांडारकर, अक्षय चौधरी, सरचिटणीस चेतन तिवारी, गणेश माळी, जयेश पाटील, धीरज वर्मा यांनी नियोजन केले.

बातम्या आणखी आहेत...