आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा देणार पत्र:शहरातील गढूळ पाणीपुरवठ्याचे कारण; चोवीस तासांत बदलतोय रंग पाण्याची दुर्गंधी कमी होईना

जळगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गेल्या महिन्याभरापासून पाणीपुरवठ्याविषयी तक्रारीत प्रचंड वाढ झाली आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून घराघरात पोहोचणाऱ्या पाण्याचा रंग बदलणे तसेच दुर्गंधी येत आहे. पालिका प्रशासनाकडून मात्र वेगवेगळे दावे होत असले तरी समस्या सुटलेली नाही. त्यामुळे आता हा प्रश्न सोडवण्यासाठी ‘मजीप्रा’ला पत्र देण्यात येणार आहे.

मूलभूत सेवासुविधा पुरवण्यात अपयशी ठरलेल्या महापालिकेकडे गेल्या महिनाभरापासून पाण्याच्या गुणवत्तेविषयी ओरड सुरू झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा रंग बदलला आहे. पिवळसर रंगाचे पाणी येत असल्याने मनपाने पुरवठा केलेले पाणी प्यायचे की नाही? हा प्रश्न सतावत आहे. पाण्याला दुर्गंधी येत आहे. ही समस्या अनेक दिवसांपासून असतानाही पालिका प्रशासन मात्र त्यावर मार्ग काढू शकलेली नाही.

प्रशासनाकडून केवळ वेगवेगळे दावे केले जात आहेत. जलशुद्धीकरण केंद्रातून शहरात येणाऱ्या पाण्याचा दर्जा चांगला असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे; परंतु घराघरात पाणी पोहोचल्यानंतर १२ ते १४ तासांत रंग बदलतो आहे. आता शहरातील पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘मजीप्रा’ला पत्र पाठवले जाईल.

जलवाहिनीची गळती दुरुस्तीचे आदेश
महापौर जयश्री महाजन यांनी पाण्यासंदर्भातील तक्रारी वाढल्यानंतर गढूळ पाणीपुरवठा तसेच दुर्गंधीविषयी उपाययोजना करण्याचे आदेश दिले. शहरातील वेगवेगळ्या भागात गळती असल्यास त्यांचा शोध घेणे तसेच दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांच्या भावना तीव्र असून, प्रश्न सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

आता ‘पेव्हर ब्लॉक’ची भार क्षमताही तपासणार

महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामांच्या थर्डपार्टी ऑडीट संदर्भात शंका उपस्थित झाल्यानंतर शासनाचे दोन विभाग एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने पुन्हा तपासणी करण्याची तयारी दाखवल्यानंतर मनपा आयुक्तांनी शंका असलेल्या कामांची पुन्हा एकदा पडताळणी करून घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी संबंधित शाखा अभियंत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. राज्य शासन व डीपीडीसीच्या निधीतून विकास कामे मंजूर आहेत.

त्यापैकी पेव्हींग ब्लॉकचे काम गतीने सुरू आहेत. अष्टभुजानगर व गट नंबर १०८मधील पेव्हींग ब्लॉकचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी आयुक्त विद्या गायकवाड व शहर अभियंता नरेंद्र जावळे यांनी पाहणी केली होती. त्यात थर्डपार्टी ऑडीटमधील नोंदी व मनपाच्या तपासणीत मोठी तफावत आढळली होती. त्यामुळे शासनाच्या दोन यंत्रणांत एकमेकांच्या कामाच्या पद्धतीविषयी शंका उपस्थित करण्यात आली होती. दरम्यान, मनपाने संबंधित मक्तेदारांच्या बिलांना ब्रेक लावला आहे.

पेव्हींग ब्लॉकच्या भारवाहक क्षमतेविषयी शंकेचे निरसन करण्याची तयारी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने दाखवली.मनपा आयुक्त गायकवाड यांनी आता शाखा अभियंत्यांमार्फत झालेल्या कामाच्या ठिकाणच्या पेव्हींग ब्लाॅकची अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेमध्ये तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आता पेव्हींग ब्लॉकची भार क्षमता तपासली जाईल.

बातम्या आणखी आहेत...