आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रा वाघ यांनी केली टीका:उद्धव ठाकरेंची हाैस फिटल्यामुळे महिला मुख्यमंत्र्याचा मुद्दा काढला

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘उद्धव ठाकरेंची हाैस फिटल्याने त्यांनी महिला मुख्यमंत्र्याचा मुद्दा काढला आहे. आमच्या पक्षात सर्वाधिक महिला आमदार आहेत. त्यापैकी कुणीही मुख्यमंत्री झाले तर आनंदच हाेईल. पण तसे झाल्यास सर्व प्रश्न सुटतील या विचाराची मी नाही’, असे परखड मत भाजप महिला माेर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी जळगावात व्यक्त केले.

जिल्ह्याच्या दाैऱ्यावर त्या मंगळवारी आल्या. या निमित्ताने भाजपच्या जिल्हा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बाेलत हाेत्या. आमदार सुरेश भोळे, डॉ. राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर, दीपक सू्र्यवंशी, दीप्ती चिरमाडे उपस्थित होते. प्रत्येक प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेले आहे. त्यांचे उत्तर तेच आमचे उत्तर असल्याचे त्या म्हणाल्या. पक्षातील नेते महिलांबद्दल बोलल्याबद्दलही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. तो जुना विषय असल्याचे त्या म्हणाल्या. भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा प्रश्न त्यांनी खासदार संजय राऊत यांनी महिलेविषयी केलेले वक्तव्य, ठाकरे सरकारच्या काळात एका महिलेच्या वाहनात पिस्तूल ठेवण्यात आले हाेते. तो महिलांचा सन्मान होता का? असा प्रश्न उपस्थित केला.

बातम्या आणखी आहेत...