आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरीक्षण:रशियातील डनलिन, इरानचा वाळवंटी रणगाेजा जिल्ह्यातील जलाशयांवर

जळगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

थंडीचा जोर वाढताच जिल्ह्यातील हतनूर, वाघूर, भोकरबारी, बहुळा, मेहरुण, हरताळा जलाशयावर परदेशी पक्ष्यांचे आगमन झाले आहे. त्यात डनलिन, वाळवंटी रणगाेजा, पाणटिवळा, भारतीय ठिपकेवाला गरूड या पक्ष्यांचा समावेश आहे.

वन्यजीव संरक्षण संस्थेचे पक्षी अभ्यासक राहुल सोनवणे, प्रसाद सोनवणे, रवींद्र फालक, अमन गुजर, बाळकृष्ण देवरे यांनी निरीक्षण करुन नोंदी घेतल्या आहेत.

भारतीय ठिपकेवाला गरुड : संकटग्रस्त शिकारी पक्षी आहे. जिल्ह्यात माळरानांवर दिसताे. सहा वर्षापासून शहरालगत ताे हमखास दिसताेच.

वाळवंटी रणगोजा : अफगाणिस्तान, इरान, तुर्कीस्तान, मंगोलिया या वायव्येकडील प्रदेशांकडून हा पक्षी हिवाळ्यामध्ये भारतात स्थलांतर करतो.

डनलिन : रशिया, आईसलँड, नॉर्वे अति उत्तरेकडील भागातून मध्य भारतात क्वचितच स्थलांतर करणारा चिखल पायटा पक्षी आहे.

काळ्या शेपटीचा पाणटिवळा : आईसलँड, रशिया अति उत्तरेकडील भागातून हिवाळी स्थलांतर करणारा पाण टिवळा आपल्या लांब पल्ल्याच्या न थांबता करणाऱ्या उड्डाणांसाठी प्रसिद्ध आहे. IUCN च्या रेड डेटा लिस्टमध्ये धोक्याजवळ पक्षी प्रजातींमध्ये समाविष्ट आहे.

बातम्या आणखी आहेत...