आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआशाबाबानगरात वृंदावन मित्र मंडळ व श्रीमद भागवत बहुउद्देशीय सेवा संस्थेतर्फे अखंड हरिनाम संकीर्तन व संगीतमय श्रीमद भागवत कथा सप्ताह सुरू आहे. या भागवत कथेत गुरुवारी सायंकाळी श्रीकृष्ण जन्मावर सजीव आरास साकारण्यात आली. यात भरत सैंदाणे यांनी वासुदेवाची तर आठ महिन्यांचा चिमुरडा तनुष पाटील हा श्रीकृष्ण झाला होता.
या सजीव आरासमुळे आशाबाबानगरात द्वापार युग अवतरल्याचा भास होत होता. आशाबाबानगरात २९ जानेवारीपासून हरिनाम संकीर्तन व संगीतमय भागवत कथा सुरू आहे. यंदा भागवत कथेचे पाचवे वर्षे आहे. दैनंदिन कार्यक्रमात काकड आरती, हरिपाठ, भागवत कथा व संकीर्तन असे कार्यक्रम घेण्यात येत आहे.
गुरुवारी भागवत कथाकार श्रीराम महाराज यांनी वराह अवतार, वामन अवतार, मच्छिंद्र अवतार अशा विविध अवतारांवर निरूपण करत सायंकाळी ५ वाजता श्रीकृष्ण जन्मावर सजीव आरास साकारण्यात आली. या संगीतमय भागवत कथेसाठी वृंदावन सांस्कृतिक मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ सैंदाणे, श्रीमद भागवत बहुउद्देशीय सेवा संस्था अध्यक्ष विलास कोळी, मुरलीधर खलसे, गजानन महाजन, राजकुमार महाले आदींनी सहकार्य केले.
जन्मोत्सवावेळी फुलांची उधळण
वासुदेवांचे बाल श्रीकृष्णांसह आगमन सभा मंडपात झाल्यावर त्यांच्यावर फुलांची मोठी उधळण करण्यात आली. तसेच स्वागतपर संगीतमय धार्मिक गाणी म्हणण्यात आली. बाल श्रीकृष्णाची लीला पाहण्यासाठी या निमित्ताने संपूर्ण संभामंडपातील भाविक उभे झाले होते. त्यांनी वासुदेव व श्रीकृष्णाला उपस्थितांनी जाण्यास मार्ग करून दिला.
उद्या पालखी सोहळा
सप्ताहात ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर ५ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता श्रीराम महाराज उंटावदकर यांचे काल्याचे कीर्तन, दुपारी १२ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम हाेणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.