आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दररोज काकडी खा, रक्तदाब राहिल नियंत्रित; जळगावात रोज गिरणा काठावरील 60 क्विंटल चंद्रा काकडीची होतेय विक्री

जळगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काकडीत तब्बल ९० टक्के पाण्याचे प्रमाण असते. वाढत्या तापमानामुळे काकडीची मागणी वाढली. बाजारपेठेत गिरणा काठावरील ‘चंद्राकाकडी’ला अधिक मागणी आहे. जळगाव शहरात पाचोरा तालुक्यातील कुरंगीसह परिसरातून ३०, एरंडाेल तालुक्यातील उत्राण भागातून २५ असे ६० विक्रेते या काकडीच्या विक्रीसाठी येतात. रोज ६० क्विंटल मालाची विक्री होते. पाचोरा तालुक्यातील कुरंगी, एरंडोल तालुक्यातील उत्राण, धरणगाव तालुक्यातील अंजनविहिरे, तापी काठावरील जळगाव तालुक्यातील भोकर या भागात काकडीचे पीक घेतले जाते.

आठवड्यापासून मागणी जास्त
तापमानात जसजशी वाढ होते आहे, तसतशी काकडीची मागणीही वाढली. गिरणा काठावरील शेतकऱ्यांकडून दरराेज एक क्विंटल चंद्राकाकडी आणतो. माझ्यासारखे परिसरातील २५ ते ३० विक्रेते आहेत. ५० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जाते. सायंकाळी चार वाजेपर्यंत माल संपतो, असे पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथील विक्रेता निवृत्ती कोळी यांनी सांगितले.

हे आहेत पोषण तत्व
काकडीत खुप कमी कार्बोहायड्रेट‌्स आणि कॅलरी असतात. शरीराला आवश्यक असणारे विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. ३०० ग्रॅम काकडीत कॅलरीज ४५ सीएएल, कार्ब्स ११ ग्रॅम, प्रोटिन २ ग्रॅम, फायबर २ ग्रॅम, विटॅमिन्स सी १४ टक्के, विटॅमिन्स के ६२ टक्के, मॅग्नेशियम १० टक्के, पोटॅशियम १३ व मँगनीज १२ टक्के.

अन्न पचनासाठी काकडी फायदेशीर
आहारात काकडीचा नियमित समावेश असायला हवा. कारण अन्न पचनासाठी ती पुरक ठरते. काकडीत भरपूर पोषकतत्व असतात. डोळ्यांवर तिचे काप ठेवले तर जळजळ होण्याचे प्रमाण कमी होते. पोषणमूल्यांचा जर विचार केला तर काकडी न सोलता खाणे अधिक उत्तम असते. काकडीचा आहारात समावेश केल्यामुळे वजन आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. त्यामुळे काकडी आरोग्यदायी आहे.
डॉ. देवानंद सोनार, योगाचार्य व आहारतज्ञ

बातम्या आणखी आहेत...