आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या बारावी परीक्षेसह सीबीएसई व दहावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी अापल्या आहाराकडे दुर्लक्ष करतात. परिणामी एकीकडे परीक्षेचा ताण व आहाराकडे दुर्लक्ष यामुळे विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडते.
त्यामुळे परीक्षेच्या काळात बाहेरील अन्न व खूप खारट पदार्थ खाणे टाळावे. अतिरिक्त साखर असलेले पदार्थ खाल्ल्यास मेंदू शिथिल होतो. परिणामी स्मरणशक्ती कमी होते. त्यामुळे चिडचिड वाढू शकते. केलेला अभ्यास आठवण्याची क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळावे, असे डॉ. भाऊराव नाखले यांनी दिला आहे.
असा घ्या आहार : पाणी पिण्यासाठी गजर लावावा
प्रथिनयुक्त आहार घ्या : परीक्षार्थींचा आहार प्रथिनयुक्त असणे गरजेचे आहे. आहारामध्ये मुगाची डाळ, दूध, दही, मोड आलेली कडधान्ये याचा समावेश असावा. प्रथिनयुक्त पदार्थ नाश्ता, दुपारचे जेवण किंवा रात्रीचे जेवण यात असायला हवीत.
दररोज नाष्टा घ्या : सकाळचा नाष्टा कधीही वगळू नये. सकाळी पौष्टिक नाष्टा केल्यास दिवसभर विद्यार्थी ताजेतवाने वाटेल. त्यामुळे अभ्यासही चांगला होईल. आहार शक्यतो सात्विक असायला हवा.
भरपूर पाणी प्या : भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. पाणी पिणे होत नसल्यास आवर्जून पाणी पिण्यासाठी गजर लावावा आणि पाणी प्यावे. अंतर ठेवून जेवण करा : दर काही तासांनी खात रहा. एकाचवेळी भरपूर, पदार्थ खाण्यापेक्षा थोड्या-थोड्या वेळाने खात जा. त्यामुळे अभ्यास करताना झोप येणार नाही.
विद्यार्थ्यांनाे, परीक्षाकाळात हे करू नका
जास्त तेलकट, तिखट पदार्थ खाल्ल्यास त्याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोटदुखी, खोकला याला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे असे पदार्थ टाळावेत. उन्हाचा कडाका जाणवत असला तरी कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे. शक्यतो बाहेर सरबत, शीतपेये घेऊ नयेत. घरातील नारळ पाणी, ताक यांसह लिंबू सरबत चालू शकतील.
अतिरिक्त साखर असलेले पदार्थ खाल्ल्यास मेंदू शिथिल होतो. परिणामी स्मरणशक्ती कमी होते. त्यामुळे चिडचिड वाढू शकते. केलेला अभ्यास पुन्हा-पुन्हा आठवण्याची क्षमता कमी होऊ शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.