आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा आयोजित:मनपातर्फे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; आरास स्पर्धा

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शासन पुरस्कृत ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत जळगाव महापालिकेतर्फे शहरातील घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांकरिता पर्यावरणपूरक मूर्ती स्थापना व आरास या विषयाकरिता स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

महपालिकेच्या सार्वजनिक गणेशोत्सव-२०२२ पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा आयोजित स्पर्धेत सहभाग नोंदवण्याकरिता आपल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची माहिती फोटोज अथवा व्हिडिओ स्वरूपात १६ सप्टेंबरपर्यंत पर्यावरण विभागाचे अभियंता योगेश वाणी यांच्याकडे संपूर्ण नाव व संपर्क आदी माहिती पाठवायची आहे. या प्रवेशिकांमधून विजेत्याची निवड परीक्षकामार्फत केली जाणार आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी सर्वांना प्रशस्तिपत्र व विजेत्यास पारितोषिक देण्यात येईल असे महापौर जयश्री महाजन, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...