आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगाव:ईडीने नोटीस बजावली की एकनाथ खडसेंना कोरोना होतो, माजी मंत्री गिरीश महाजन यांची टीका

जळगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझा कोरोना हा ईडीचा कोरोना नाही. माजी मंत्री एकनाथ खडसेंना ईडीच्या तारखा पाहून कोरोना होतो, अशी टीका आमदार गिरीश महाजन यांनी केली. तसेच माझ्यासह कुटुंबाने शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्याचेही महाजन यांनी या वेळी सांगितले. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची आमदार गिरीश महाजन यांनी पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मला एकदाच कोरोना झाला. ईडीच्या तारखा पाहून कोरोना होत नाही. ईडीने नोटीस बजावली की माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोना होतो. खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे ते सांगतात मात्र मुंबईला फिरतात. माझ्या संपूर्ण कुटुंबाला बाधा झाली होती व आम्ही सरकारी रुग्णालयात उपचार घेतले. खोटे बोलणे अन् तशी कागदपत्रे सादर करणे आम्ही करत नाही, असेही गिरीश महाजन यांनी या वेळी सांगितले.

भाजपच्या बंडखोर नगरसेवकांवर कारवाई होईल : जळगाव महानगर पालिकेत २७ नगरसेवकांनी पक्षांतर केले असून या नगरसेवकांवर योग्य ती कारवाई केली जाईल. महापालिकेत मोठा घोडेबाजार झाला असून पैसे देऊन नगरसेवकांना वळवण्यात आले आहे. राज्यात सत्ता असल्याने हा खेळ झाला असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...