आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवीन शैक्षणिक वर्षाला बुधवारपासून सुरूवात होणार असल्याने शैक्षणिक साहित्यांनी बाजारपेठ गजबजली आहे. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर यंदा साहित्य खरेदी केले जाणार असल्याने बाजारात विद्यार्थी व पालकांची मोठी गर्दी होत आहे. यंदा शालेय शुल्क १५ ते २० टक्के तर शैक्षणिक साहित्याच्या किमतीत २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे पालकांच्या खिशाला भुर्दंड बसत आहे. गेल्या वर्षी दीडशे रुपये डझन असणाऱ्या वह्या आता २०० रुपयांवर गेल्या आहे. पाच रुपयांना मिळणारा साधा पेन आता सात रुपयांना मिळत आहे तर २०० रुपयांचे दप्तर २६० रुपयांना झाले. यंदा पहिल्या दिवसापासून नियमित पूर्णवेळ शाळा सुरू होणार आहे. त्यासाठी शाळांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. यंदा शैक्षणिक साहित्याच्या किमतीत २५ ते ३० टक्के वाढ झाली आहे. वह्यांच्या किमती डझनमागे ६० ते १०० रुपयांनी वाढल्या आहे. नामांकित कंपन्यांच्या वह्यांच्या दरात ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी दीडशे रुपये डझन असणाऱ्या सर्वसाधारण प्रकारातील वह्या आता २०० रुपये डझनावर गेल्या आहे. दरम्यान, सन २०१९ मध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक साहित्य एक हजार रुपयापर्यंत मिळत होते. यंदा त्यासाठी दीड हजार रुपये मोजावे लागत आहे. इंधन दरवाढ, मजुरी वाढल्याने साहित्याच्या किमतीत वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे पालकांना यंदा महागाईची झळ सहन करावी लागते आहे.
गेल्या वर्षी कोरोनामुळे होती सवलत... कोरोना काळात शाळा गेली दोन वर्षे बंद होत्या; पण काही शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवत शुल्क वसूल केले. शासन आदेशामुळे गेल्या वर्षी शिक्षण शुल्कात १० ते १५ टक्के सवलत देण्यात आली. यंदा शिक्षण शुल्कात १५ ते २० टक्के वाढ झाली आहे.
कागदासह वाहतूक महागल्याने दरवाढ ^जगभरात कागद, शाई, स्टिलचे दर वाढले आहेत. याचा परिणाम शालेय साहित्यावर झाला असून वह्यासह इतर कंपन्यांचे प्रिंटेड स्टेशनरी यांचे दर २५ ते ३० टक्क्यांनी महागले आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे दप्तर, पाटी, पुस्तक, गणवेश व अन्य साहित्याची विक्री झाली नाही. वाहतूक खर्च, पेपरच्या वाढलेल्या किमतीमुळे शैक्षणिक साहित्य यंदा महागल्याचे दिसते आहे. सारंग पाटील, विक्रेता, जळगाव
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.