आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठातील कंत्राटी प्राध्यापक भरतीत गोंधळ:शिक्षणक्रांती संघटनेचा आरोप; सहसंचालक करणार चौकशी

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे कंत्राटी सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरती संदर्भात जाहिरात 2/2022 नुसार निवड प्रक्रिया राबविण्यात आली. परंतु या भरतीच्या निवड प्रक्रियेत शासन निर्देश व कायद्याचे उल्लंघन करण्यात आले असल्याचा आरोप शिक्षणक्रांती संघटनेतर्फे करण्यात आला होता. याबाबत चौकशीची मागणी देखील करण्यात आली होती. त्यानुसार संचालक कार्यालय पुणे यांच्याकडून तपासणीचे आदेश देण्यात आले असून बुधवारी 2 नोव्हेंबर रोजी सहसंचालक स्वतः या प्रकरणाची चौकशी करणार आहे.

कंत्राटी प्राध्यापक भरतीत स्थानिक निवड समिती अपूर्ण होती. यासोबतच नेट सेट पात्रता धारकांना अर्ज तपासणी प्रक्रीयेत मुलाखतीसाठी पात्र केले पण मुलाखतीत त्यांना मात्र डावलण्यात आले. या निवड प्रक्रियेची चौकशी लावून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी शिक्षणक्रांती संघटनेतर्फे संचालकांकडे केली होती. संघटनेच्या मागणीनंतर संचालक कार्यलयाकडून सहसंचालकांना तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान भरती संदर्भात प्रा. संजय भोकरडोळे यांनी देखील तक्रार केली आहे. जाहिरातीत दिलेल्या ईडब्ल्यू एस आरक्षणाला विद्यापीठाने केराची टोपली दाखवली असून गेल्या वर्षी नियुक्ती दिलेल्या बहुतेक उमेदवारांना नियुक्त्या दिलेल्या आहेत. कायद्यानुसार भरती करण्याचा दावा करणाऱ्या विद्यापीठाने आवश्यक असलेली निवड यादी व प्रतीक्षा यादी शेवटपर्यंत जाहीर केलेलीच नाही. त्यामुळे मुलाखतीनंतर निवड कोणाची झाली हे कोणत्याच उमेदवाराला आजपर्यंत कळू शकलेले नाही.

दहा पैकी फक्त एकाच जागेवर नियुक्ती

विद्यापीठाने कंत्राटी सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. जाहिरातीनुसार 105 सहाय्यक प्राध्यापकांची विविध विषयांसाठी भरती करण्यात येणार होती. जाहिरातीत ईडब्ल्यू एस या संवर्गासाठी दहा जागा दर्शवण्यात आल्या होत्या. मात्र या दहांपैकी विद्यापीठाने फक्त एका जागेवर उमेदवाराला नियुक्ती दिलेली आहे.

उर्वरित जागांवर पात्र उमेदवार असूनही व त्यांची मुलाखत यशस्वी होऊ नही त्यांना नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा उमेदवारांचा घटनात्मक अधिकार डावला गेला आहे. ई डब्ल्यूएसच्या उमेदवारांना नियुक्ती का देण्यात आली नाही याचे कोणतेही उत्तर विद्यापीठ देत नाही. मात्र केवळ वैयक्तिक देशातूनच या संवर्गाच्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात आलेला नाही अशी उघड चर्चा विद्यापीठामध्ये आहे.

बातम्या आणखी आहेत...