आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय विद्यार्थ्यात पोषण शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न:सुधारित दराला मान्यता; प्राथमिक शाळेसाठी दररोज खर्च होणार 5.45 रुपये

जळगाव12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतंर्गत प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना आहाराचा पुरवठा करण्यास तसेच त्यासाठी सुधारित दरास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार आता 450 उष्मांक आणि 12 ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यासाठी प्राथमिक शाळेतील प्रति विद्यार्थ्याला प्रतिदिन 5.45 तर उच्च प्राथमिकसाठी 700 उष्मांक व 20 ग्रॅम प्रथिनेयुक्त आहारासाठी 8.17 रुपये खर्च करण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतंर्गत इयत्ता 1 ली ते 5 वी मधील प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 450 उष्मांक व 12 ग्रॅम प्रथिनेयुक्त तसेच इयत्ता 6 वी ते 8 वी मधील उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 700 उष्मांक व 20 ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यात येताे. योजनेतंर्गत केंद्र शासनाकडून प्रतिदिन प्रती विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी 100 ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी 150 ग्रॅम तांदूळ पुरवण्यात येतो. केंद्र शासनाने अन्न शिजवण्याच्या दरात 10.99 टक्के वाढ करण्याचे निर्देश दिलेले होते. त्यानुसार अन्न शिजवण्याच्या दरासाठी प्रतिदिन प्रती लाभार्थी आहार खर्च मर्यादा प्राथमिक वर्गासाठी 4.97 आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी 7.45 याप्रमाणे निश्चीत करण्यात आली होती. सन 2022-23 या आर्थिक वर्षात अन्न शिजवण्याच्या दरात 9.6 टक्के दरवाढ मंजूर करण्यात आलेली आहे.

या योजनेतंर्गत ग्रामीण भागात तांदुळाबरोबर इतर धान्यादी मालाचा पुरवठा शाळास्तरावर करण्यात येतो. त्यापासून आहार बनवण्यासाठी प्राथमिक व उच्च प्राथमिक लाभार्थ्यांसाठी आहार खर्च निश्चीत करण्यात आला आहे. त्यानुसार प्राथमिकसाठी आहारावर 5.45 रुपये,धान्यादी माल पुरवण्याचा खर्च 3.37 रुपये तर इंधन आणि भाजीपालासाठी 2.8 रुपये खर्च करण्यात येणार आहे. उच्च प्राथमिक विद्यार्थ्यासाठी आहार 8.17,धान्यादी माल पुरवण्यासाठी 5.6 तर इंधन व भाजीपालासाठी 3.11 रुपये खर्च करण्यात येणार आहे.

या योजनेमध्ये शहरी भागात महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात स्वयंसेवी संस्था,बचत गट यांच्यामार्फत शिजवलेल्या तयार आहाराचा पुरवठा विद्यार्थ्यांना करण्यात येतो. शहरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीचा वापर करुन तयार आहाराचा पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे शहरी भागातील विद्यार्थ्यासाठी प्राथमिक गट 5.45 तर उच्च प्राथमिकसाठी 8.17 रुपये आहार खर्च करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...