आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनपा आयुक्त सतीश कुलकर्णी हे ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर मर्जीतील अधिकारी नियुक्तीसाठी पालिकेतील दोन गट सक्रिय आहेत. जळगावचा अनुभव असलेल्या अतिरिक्त आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना आयुक्तपदी बढती मिळण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून पालकमंत्र्यांना साकडे घातले जाते आहे. एप्रिलमध्ये आयुक्त कुलकर्णी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागेवर काेण येणार? याबाबत उत्सुकता आहे. पंधरा दिवसांपूर्वी राजेश कानडे, कल्याणचे सुनील पवार, गोरक्ष गाडीलकर यांच्या नावाची चर्चा सुरू होती. आयुक्त पदासाठी इच्छुकांच्या यादीत अतिरिक्त आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांचेही नाव आहे. पालिकेचे काही पदाधिकारी व नगरसेवकांनी डॉ. गायकवाड यांच्या नावासाठी जोर धरला आहे. मनपा कामकाजाची माहिती आहे.
त्यामुळे त्यांना निर्णय घेताना अडचण येणार नाही या मुद्द्यांचा आधार दिला जातो आहे. दरम्यान पालिकेतील दोन गट आयुक्त आपल्या मर्जीतील असावे यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.