आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदोन्नती:पोलिस दलातील आठ कर्मचाऱ्यांना पदोन्नती

जळगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा पोलीस दलातील पोलिस हवालदार असलेले आठ हेड कॉन्स्टेबल यांना सेवा ज्येष्ठेनुसार त्यांना सद्या नेमणूक आहे त्याच ठिकाणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली. याबाबतचे आदेश मंगळवारी सायंकाळी पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी काढले.

हेड कॉन्स्टेबल असलेल्या आठ कर्मचाऱ्यांना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश मंगळवारी सायंकाळी काढले. यात भुसावळ तालुका पोलिस ठाण्यातील संजीव मोंढे, एमआयडीसी पोलीस ठाण्यातील राजू राणे, पोलिस मुख्यालयातील साहेबराव चौधरी, शनिपेठ पोलिस ठाण्यातील संजय शेलार, पोलिस मुख्यालयातील नंदलाल चौधरी, मोटार परिवहन विभागातील शिवाजी सुतार, जिल्हा विशेष शाखेतील दिनेश बडगुजर व एचएसपी शाखेतील शामकांत सोनवणे यांना पदोन्नती मिळाली.

बातम्या आणखी आहेत...