आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाधित रुग्ण:जिल्ह्यात आठ नवे कोरोना बाधित रुग्ण ; 7 जणांची कोरोनावर मात

जळगाव3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून कोरोना बाधितांची संख्या वाढण्यास सुरवात झाली असून बुधवारी जिल्ह्यात ८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तर दिवसभरात ७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एकच कुटुंबातील तसेच बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती पॉझिटिव्ह येत आहे. बुधवारी दिवसभरात जळगाव शहरात १, ग्रामीण १, भुसावळ २, चोपडा २, पाचोरा १, धरणगाव तालुक्यात देखील १ रुग्ण आढळून आला आहे. सध्या २५ रुग्ण सक्रिय असून सर्वाधिक ८ रुग्ण भुसावळ तालुक्यातील आहे. यासोबतच चोपडा ६, जळगाव शहर ४, यावल ३ तर जळगाव ग्रामीण, पाचोरा, धरणगाव तालुक्यासह इतर जिल्ह्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. सक्रिय सर्व रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे. कोरोना घातक नसला तरी नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींनी तपासणी करून घ्यावी, कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...