आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्कार परिवारातर्फे ‘एक गाव एक उत्सव’:शिवतांडव, ब्रह्मा-विष्णू-महेश अन् राधा-कृष्णाच्या नृत्य स्तुतीने कलेचे दर्शन

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संस्कार परिवारातर्फे ‘एक गाव एक उत्सव’ या कार्यक्रमा अंतर्गत रविवारी दुपारी 3३ वाजता रिंग रोडवरील महेश प्रगती मंडळात ‘राधा अष्टमी’ उत्सव साजरा करण्यात आला. संस्कार परिवारातर्फे गेल्या आठ वर्षांपासून 'राधा अष्टमी' हा उत्सव साजरा केला जात आहे. यात शहरातील 25 मंडळांतील चारशेहून अधिक सदस्य एकत्र येतात. तर नृत्य स्तुतीत 250 पेक्षा अधिक सदस्यांकडून विविध प्रकारच्या नृत्यातून राधा-कृष्णासह ब्रह्मा, विष्णू व महेश यांची स्तुती केली जाते.

महेश प्रगती मंडळात रविवारी संस्कार परिवारातर्फे 'राधा अष्टमी'चा कार्यक्रम घेण्यात आला. यात शहरातील २५ मंडळ एकत्र येत विविध कला सादर केली. यात १५ ते २५ वयोगटातील महिलांकडून विविध गाण्यांतून राधा-कृष्णाची स्तुती करण्यात आली. या कार्यक्रमात नवी व जुनी अशा दोन्ही पिढींकडून योगदान देण्यात आले. या कार्यक्रमाद्वारे युवा पिढीत जागृरूमता आणण्यासाठी हा कार्यक्रम गेल्या ८ वर्षांपासून घेण्यात येत असल्याचे संस्कार पिरवारातर्फे सांगण्यात आले. या कार्यक्रमात सर्व महिला व मुलींनी आपल्या नृत्यातून राधा-कृष्णाचा जीवनपट उलगटण्यात आला.

राधा जन्म 'उत्सवा'ने आणली रंगत

संस्कार परिवारातर्फे राधा अष्टमीनिमित्ताने 15 ते 75 वयोगटातील महिला-मुलींनी विविध कार्यक्रम सादर केले. यात राधा-कृष्णाची विविध प्रकारची नृत्य सादर करण्यात आली. यात राधा-कृष्ण, ब्रह्मा, विष्णू व महेश यांची स्तुती करण्यात आली. तसेच शिवतांडव नृत्य, श्लोक आदी कार्यक्रमही नृत्यातून सादर करण्यात आले. या निमित्ताने राधा मातेच्या जन्म हा 'उत्सव' सादर करण्यात आला. कार्यक्रमात राधा-कृष्ण स्तुती, शिवतांडव, गांधर्व मन्यांचे आगमन आदीं मोठी रंगत आणली.

परिवाराकडून राबवले जाणारे कार्यक्रम

परिवारातर्फे प्रत्येक सण पारंपरिक पद्धतीने साजरा करून त्याचे महत्त्व सांगितले जाते. यात गीता जयंती कार्यक्रमात शाळांमध्ये गीता मुखपाठ शिकवणे, शाळांमध्ये संस्कारवर्ग चालवणे, विष्णू सहस्त्रनाम शिकवणे, कावडयात्रा काढणे, स्मशानभूमीत भगवद््गीता पठण करणे, तसेच अधुनिकतेला अध्यात्माला जोडणे आदी कार्यक्रम घेण्यात येतात.

बातम्या आणखी आहेत...