आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाट्य परीक्षण:‘एक राेझ’ नवीन विचार मांडणारे नाटक

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पँथर नामदेव ढसाळ यांनी बाबासाहेबांनंतर ज्या त्वेषाने चळवळ जिवंत ठेवली हाेती त्या नंतरच्या मधल्या पिढीने ही क्रांतीची मशाल धगधगती ठेवली नाही. या पिढीने त्या क्रांतीची फळे चाखली आणि धग विरून गेली. ही खंत लेखक आकाश बाविस्कर ‘एक राेझ’ या नाटकाच्या माध्यमातून सांगतात. चळवळीच्या अगाेदरच्या पिढीचे जे दादासाहेब गायकवाड यांच्या साेबत असतात जे बाबा रघू बापू कृष्णा यांचा सांभाळ करीत असतात. रघूने चळवळीला वाहून घेतले आहे. लेखक म्हणून आकाश बाविस्कर यांनी संहितेवर अजून मेहनत घेणे आवश्यक वाटले. ‘राेझ’ची कहाणी सांगताना खूप विषय त्यांनी हाताळले. आंबेडकरांची चळवळ, त्यानंतर नामदेव ढसाळ, पँथर्सचा लढा, फुले, शाहू, आंबेडकर यांचा वारसा पुढील पिढीने चालवणे त्यांचा स्वार्थीपणा हे असे भेदक विषय काही संवादामधून येतात. काही ठिकाणी कव्वाली आणि पाेवाड्याचीही मदत घेण्यात आली; परंतु विषयाची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि स्क्रिप्ट सशक्त हाेण्यासाठी या विषयांशी संबंधित प्रसंग पेरणे आवश्यक हाेते. लेखकाचा राेख ही प्रस्तुत हाेताे. राेझच्या कथनातून ते असे की तुम्ही तुमच्या संगिनीला बराेबर घ्या. चळवळीमध्ये तिची साथ द्या. बघा पँथर्स कसे चळवळीत त्वेषाने हा लढा चालू ठेवतील.

राेझ आणि तिच्या माेठ्या बहिणीवर गंभीर प्रसंग ओढवूनदेखील ती रघूवर असलेले प्रेम ती याच भावनेतून व्यक्त करते. रघूने चळवळीला वाहून घेतलेले आहे व ताे या बाबतीत अयशस्वी हाेणार नाही या भीतीपाेटी राेझच्या प्रेमाचा अव्हेर करताे. लेखक, दिग्दर्शक आकाश बाविस्कर लेखक म्हणून यशस्वी आहेत. त्याचप्रमाणे बाबाची भूमिका समरसून पार पाडतात. दिग्दर्शकाची चुणूक काही प्रसंगांमधून जाणवते. उदाहरणार्थ सावित्रीबाई, रमाबाई आणि फुलनदेवी यांनी त्यांच्या जीवनसाथींना कशी खंबीर साथ दिली याचे कथन राेझ ज्या पद्धतीने करते ते प्रभावीपणे त्याचबराेबरीने बाबासाहेबांचे स्त्री शिक्षणाबाबतचे हक्क मिळवून देण्याबाबत संविधानात्मक कामगिरी आणि स्त्री आता अत्याचार सहन करणार नाही. याबद्दलचे भाष्य माेठ्या तडफेने गायत्री ठाकूर अभिनय सामर्थ्याने सादर करतात. त्यांचा रंगमंचावरील वावर, भूमिकेची समज काैतुकास पात्र. रघू या भूमिकेत राहुल पवार आत्मविश्वासाने संपूर्ण रंगमंचावर वावरतात.

कवी, ढाेलकीवाला आणि चळवळीचा सच्चा कार्यकर्ता आणि या विचारांवर ठाम भूमिका असलला सहजपणे वठवला. बापू कृष्णा यांच्या भूमिकेत प्रज्वल बाेरस, सारंग साेनवणे याेग्य साथ देतात. हिमानी पांडे, निकिता, प्रियंका, साक्षी आपले राेल व्यवस्थित पार पाडतात. रंगभूषा, वेशभूषा मयूर ठाकूर यांची उत्तम कामगिरी. पार्श्वसंगीत आणि गायिका मानसी अळवणी. एक वैचारिक दिशा देणारे नाटक आकाश बाविस्कर यांनी मेहनतीने सादर केले. सर्वांची त्यांना मिळालेली साथही उत्तम.

बातम्या आणखी आहेत...