आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसे विरुद्ध भाजप:केंद्र सरकारकडून महागाई वाढत असताना, राज्य सरकार विरोधात मोर्चा काढणे म्हणजे भाजपचा दुटप्पीपणा, एकनाथ खडसेंची भाजपवर टीका

जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील लोडशेडिंगच्या विरोधात आज भाजपकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपकडून दुटप्पीपणा सुरू आहे, त्यांनी लोडशेडिंगच्या विरोधात मोर्चा काढण्यापेक्षा वाढत्या महागाईच्या विरोधात मोर्चा काढायला हवे होते. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासोबत भाजपने पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढत्या किंमतीवरून भाजपवर निशाणा साधला आहे.

नेमके काय म्हणाले खडसे?
विजेच्या संदर्भामध्ये लोडशेडिंगच्या विरोधामध्ये भाजपने आज आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र मला वाटते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवित असतांना डिझेल, पेट्रोल, घरगुती गॅसचे महागाई वाढत चालली आहे. त्याच्या विरोधात तर भाजपने आंदोलन आणि आक्रोश मोर्चाचे आयोजन केले असते, तर बरे वाटले असते. मात्र भाजपचा हा दुटप्पीपणा असून राज्य सरकार विरोधात एकीकडे लोडशेडिंगबद्दल आंदोलन करायचे आणि केंद्र सरकारने डिझेल,पेट्रोल, गॅस यासह इतर वस्तूची वाढ केल्या, त्याबद्दल भाजप शब्ददेखील काढत नाही हा त्यांचा दुटप्पीपणा आहे. असा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.

विजेची टंचाई आहे हे मान्य करून चालावे लागेल हे आजची नसून दरवर्षी ही टंचाई उन्हाळ्यात जाणवते, यावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे, असे वक्तव्य माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे. गेली काही दिवस रोजच इंधन दरवाढ होत असताना भाजपकडून त्यावर भाजपनेत्यांकडून आवाक्षरही निघत नाही, असे का असा सवाल एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे.

इंधन दरवाढीबद्दल शांत का?
पेट्रोल-डिझेलचे भाव गगणाला भिडले आहेत. महागाईने टोक गाठले आहे, यामुळे सामान्य माणूस हैराण झाला आहे. यातच आता गॅसचे दरदेखील वाढले आहे. आता सामान्य माणसाने जगायचे कसे हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. यावर भाजप नेत्यांनी शांतता बाळगली आहे. आणि दुसरीकडे महावितरणाच्या कारभाराबद्दल आक्रोश केला जातो हाच खरा दुटप्पीपणा आहे. राज्यातील भाजप नेत्यांनी यावर बोलयला हवे असे खडसेंनी म्हटले आहे.