आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकनाथ खडसेंना मोठा धक्का:जळगाव दूध संघावर भाजप-शिंदे गटाचे वर्चस्व; मंदाकिनी खडसे,सतीश पाटलांचा पराभव

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री सतीश पाटील यांचा पराभव झाला असून दूध संघावर भाजप-शिंदे गटाचे वर्चस्व दिसून आले आहे. एकनाथ खडसे यांचे महाविकास आघाडीचे सहकार पॅनलला केवळ 4 जागा मिळाल्या आहे. तर मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील हे विजयी झाले आहेत. या निवडणुकीच्या निमित्तानं एकनाथ खडसे यांच्या गडाला सुरुंग लावला आहे. मतमोजणी केंद्राच्या बाहेर भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचा जोरदार जल्लोष केला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, जळगाव दूध संघात आम्ही पारदर्शक काम केले, तरी आम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात खोक्यांचा वापर करण्यात आला असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. तर दोन मंत्री पाच आमदारांसह खासदारांनी एकत्र येत आमच्या पॅनलच्या विरोधात निवडणूक लढविली असा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

निकालाची उत्सुकता : दूध संघात ‘क्राॅस वाेटिंग’च निर्णायक; पाचाेरा, भडगाव, चाळीसगाववर भिस्त

दूध संघाच्या निवडणुकीत एकूण 441 मतदार आहेत. या सर्व मतदारांनी शनिवारी मतदानाचा हक्क बजावला. रावेर लाेकसभा मतदारसंघात असलेल्या तालुक्यांत क्राॅस वाेटिंगमध्ये मंदाकिनी खडसेंच्या बाजूने काैल आहे. तर जळगाव लाेकसा मतदारसंघात हीच स्थिती आमदार मंगेश चव्हाण यांच्या बाजूने आहे. परंतु, त्यात पाचाेरा, भडगाव आणि चाळीसगाव या तीन तालुक्यातील मतदारांचा काैल काेणाकडे? याचा अंदाज दाेन्ही पॅनलच्या उमेदवारांना नाही. या तालुक्यातील मतदारांचे मतदान खडसे की चव्हाण? हे ठरवणार असल्याचे मत मतदारांनी व्यक्त केले आहे. या निवडणुकीत बिनविराेध निवडून आलेले पाचाेऱ्याचे दिलीप वाघ यांची भूमिका मतदानापर्यंतही स्पष्ट हाेवू शकली नाही. त्यामुळे पाचाेऱ्यातील मतदारांचा काैल काेणाकडे ही बाब निर्णायक असल्याचे मानले जाते आहे.

मंदाकिनी खडसे आणि आमदार मंगेश चव्हाण यांना इतर तालुक्यात किती मते मिळू शकतात? हा अंदाज असला तरी भडगाव आणि चाळीसगावात मिळणारी मतेच निर्णायक ठरणार असल्याचे उमेदवार व कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. निवडणुकीत ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या भाजप-शिंदेसेनेच्या पॅनलविराेधात आमदार एकनाथ खडसेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे अशी लढत आहे. दाेन्ही पॅनलच्या नेत्यांनी जिल्हाभरात प्रचार केलेला असला तरी मतदारांनी पॅनलचा पर्याय टाळून वैयक्तिक उमेदवारांना मतदान केले. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...