आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाथाभाऊ फॉर्मात:खडसे म्हणाले- मी ईडीला घाबरत नाही! राष्ट्रवादी पक्ष माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा; सर्व एका टरबूजामुळे झाले, कोण ते गुगलवर सर्च करा!

जळगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे एका स्थानिक कार्यक्रमानंतर पुन्हा चर्चेत आहेत. जळगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी 'हम तो डूबे है सनम तुमको भी लेकर डूबेंगे' अशा शायराना शैलीत भाजपवर हल्लाबोल केला. तसेच आपण ईडीला घाबरत नाही ईडीचा विषय आता संपला. प्रकरण कोर्टात असल्याने कोर्टाला मात्र घाबरतो असे खडसे यांनी म्हटले आहे.

कोर्टाला घाबरतो
जळगावात एका स्थानिक कार्यक्रमात बोलताना खडसे म्हणाले- "सत्तर वर्षांचा झालोय. सत्तराव्या वर्षी कशाला? कशासाठी हे लोक माझी बदनामी करत असतील? हम तो डूबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेकर डूबेंगे, फार झालं चार काय चार महिने भरके लेंगे पर लेकर डूबेंगे." यासोबतच आता आपण भाजप नाही तर राष्ट्रवादीमध्ये आहोत. आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्याला किती पाठिंबा आहे हे देखील खडसेंनी यावेळी बोलून दाखवले आहे.

गुगलवर जाउन टरबूज कोण सर्च करा!
भाजपमध्ये कोण-कोण गद्दार होते आणि माझ्या मुलीचा पराभव कसा केला हे मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर कळाले. इथले आमदार कुणाच्या बळावर निवडून आले. तरीही कुणाचे तरी ऐकून नाथाभाऊंच्या मागे कधी आयटी, अँटी करप्शन तर कधी ईडी लावायची. नाथाभाऊंच्या घरावर रेड टाकून सुद्धा काहीच हाती लागलेले नाही. न्यायालयातही क्लोजर रिपोर्ट दिला. तरीही ईडी लावण्यात आल्याचे सांगितले जाते. एकाच माणसाच्या सांगण्यावरून हे सर्व करण्यात आले. तो कोण माहिती आहे का? गुगलवर जाउन टरबूज ऑफ महाराष्ट्र असे सर्च करा सापडेल.

राष्ट्रवादी पक्ष माझ्या पाठीशी उभा
ईडीच्या मुद्द्यावर बोलताना खडसेंनी सांगितले, माझ्या जावयाचा काहीच संबंध नसताना त्याचे नाव टाकण्यात आले. आता ईडी (अंमलबजावणी संचलनालय) चा मुद्दा पूर्णपणे संपला आहे. त्यामुळे मी ईडीला घाबरत नाही. आता हे प्रकरण कोर्टात गेले असून कोर्टाला मात्र आपण घाबरतो. आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि राष्ट्रवादी पक्ष माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

एकीकडे, एकनाथ खडसे भोसरी येथील जमीन व्यवहार प्रकरणी ईडीच्या चौकशीमुळे अडचणीत आहेत. आता हे प्रकरण कोर्टात असले तरीही राष्ट्रवादी आपल्या पाठीशी असल्याचे ते म्हणाले आहेत. तर दुसरीकडे 2017 मध्ये केलेल्या एका वादग्रस्त विधानावरून त्यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार आहे. या प्रकरणी आता राष्ट्रीय महिला आयोगाने जळगाव जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षकांना कारवाईसाठी पत्र पाठवले आहे.

बातम्या आणखी आहेत...