आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकनाथ खडसे ‘ईडी’च्या रडारवर:तीन दिवसांपासून ऐकतोय, पण कोणतीही नोटीस मिळालेली नाही : एकनाथ खडसे

जळगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीडी ज्यांच्याकडे असल्याचा दावा, त्यांनीच केले खडसेंवर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाच्या वेळी ‘त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन’ असा इशारा भारतीय जनता पक्षाला देणाऱ्या एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तीन दिवसांपूर्वीच नोटीस पाठवल्याचे वृत्त आहे. त्यासंदर्भात अधिकृत दुजोरा मात्र मिळाला नाही. दरम्यान, अजून तरी आपल्याला नोटीस मिळालेली नाही. मिळाल्यानंतर आपण त्यासंदर्भात बोलू, असे खडसे यांनी सांगितले.

दोन महिन्यांपूर्वीच (२३ आॅक्टोबर) खडसे यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या प्रवेश सोहळ्याच्या वेळी शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांनी भाषण केले होते. त्या वेळी ‘त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन’ असे वक्तव्य त्यांनी भाजपला उद्देशून केले होते. ही कथित सीडी त्यांचे कट्टर विरोधक बनलेल्या आमदार गिरीश महाजन यांच्या संदर्भात होती, असे सांगण्यात येत होते. मात्र त्यांनीच खडसेंवर आरोप केले आहेत.

दरम्यान, ‘ईडी’ कडून अशी नोटीस जारी झाल्याचे आपणही गेल्या तीन दिवसांपासून ऐकत आहोत, मात्र कोणतीही नोटीस आपल्याला अजून तरी मिळालेली नाही, असे खडसे यांनी शुक्रवारी रात्री ‘दिव्य मराठी’ला सांगितले. नोटीस मिळाली तर त्या अनुषंगाने आपण सविस्तर बोलू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सीडी ज्यांच्याकडे असल्याचा दावा, त्यांचे खडसेंवर आरोप

कथित सीडी ज्यांच्याकडे आहे, असे खडसे सांगत होते त्या प्रफुल्ल लोढा यांनीच शुक्रवारी अशी काही सीडी आपल्याकडे नाही, असे स्पष्ट करीत खडसे यांच्यावरच गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. त्यापाठोपाठ ईडीने खडसे यांना नोटीस दिल्याचीही चर्चा सुरू झाली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser