आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपला रामराम!:1987 साली पहिल्यांदाच सरपंच ते 30 वर्षे सलग आमदार, असा आहे भाजपत महत्त्वाची पदे भुषवणाऱ्या एकनाथ खडसेंचा 40 वर्षांचा राजकीय प्रवास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोठाडी गावात दोन सप्टेंबर 1952 रोजी एकनाथ खडसे यांचा जन्म झाला.

भाजप एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले असले तरीही अलीकडच्या काळापासून ते पक्षावर नाराज होते. त्यांच्या पक्षांतराचे हे भिजत घोंगडं असलेला प्रश्न आज मार्गी लागला. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे 23 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान गेल्या चाळीस वर्षांपासून त्यांचे भाजपमध्ये योगदान आहे.

  • एकनाथ खडसेंचा जन्म

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोठाडी गावात दोन सप्टेंबर 1952 रोजी एकनाथ खडसे यांचा जन्म झाला. खडसे यांचे वडील हे शेतकरी होते. त्यांचे शिक्षण कोठाळी गावातील शाळेमध्ये झाले. दरम्यान त्यांना सुरुवातीपासूनच राजकारणाची आवड होती.

  • 1987 मध्ये कोठाळी गावाचे सरपंच

1980 साली भाजपामधून खडसेंनी सक्रीय राजकारण सुरु केले. उत्तर महाराष्ट्रात भाजपाचा जनाधार वाढवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. ओबीसी नेते म्हणून त्यांनी स्वत:ची प्रतिमा निर्माण केली. त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात ग्राम पंचायतीच्या निवडणुकीपासून झाली. ग्राम पंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत एकनाथ खडसे यांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर 1987 साली ते कोठाडी गावचे सरपंच झाले.

  • 1989 मध्ये पहिल्यांदा आमदार

एकनाथ खडसे यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात सरपंचपदापासून झाली. यानंतर 1989 मध्ये ते पहिल्यांदाच भाजपाच्या तिकिटावर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून लढले. पहिल्यांदाच लढवलेली आमदारकीची निवडणूक ते जिंकले देखील. यानंतर सलग सहा टर्म (1989 – 2019) म्हणजे तब्बल तीस वर्षे मुक्ताईनगर हा खडसेंचा बालेकिल्ला राहिला.

  • अर्थ आणि सिंचन या दोन मंत्रालयांची जबाबदारी स्वीकारली

1995 ते 1999 मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते. यावेळी एकनाथ खडसेंकडे अर्थ आणि सिंचन या दोन मंत्रालयांची जबाबदारी होती. यानंतर एकनाथ खडसे यांनी नोव्हेंबर 2009 ते ऑक्टोबर 2014 या काळात विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. प्रभावी वकृत्व आणि मुद्देसूद विषय मांडण्याची कला त्यांच्यात आहे.

  • 2014 मध्ये होते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत

एकनाथ खडसे हे भाजपमधील राज्यातील प्रमुख नेते मानले जात होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अग्रस्थानी होते. मात्र शेवटी त्यांच्यापेक्षा ज्यूनिअर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे महसूल मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली.

  • भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर 2016 मध्ये राजीनामा

एकनाथ खडसे यांच्याकडे महसूल मंत्रालयाची धूरा होती. मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपातून 3 जून 2016 रोजी एकनाथ खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर एकनाथ खडसे यांच्या राजकारणाला ग्रहण लागले. यानंतर पासून ते पक्षावर नाराज आहेत .

  • 2019 मध्ये भाजपने नाकारले तिकीट

2019 मधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारण्यात आले. त्यांच्याऐवजी कन्या रोहिणी खेवलकर-खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार चंद्रकांत लिंबा पाटील यांनी 1987 मतांनी त्यांचा पराभव झाला.

बातम्या आणखी आहेत...