आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकनाथ खडसेंचे विरोधकांवर टीकास्त्र:'मीपण विरोधी पक्षनेता होतो, पण संकटाच्या काळात असा खेळ केला नाही'

जळगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा केंद्र सरकारच्या धोरणामुळे

राज्यात कोरोना परिस्थितीवरुन सुरू असलेल्या राजकारणात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीही उडी घेतली आहे. एकनाथ खडसे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. 'मीपण राज्याचा विरोधीपक्ष नेता होतो. पण, संकटाच्या काळात असा कुत्रा-मांजराचा खेळ कधी खेळला नाही', असे खडसे म्हणाले.

रविवारी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना खडसे म्हणाले की, 'महाराष्ट्रात जेव्हा-जेव्हा संकटे आली, तेव्हा राजकारण बाजूला ठेवून विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षाने हातात हात घालून काम केले आहे. विरोधी पक्षनेता म्हणूनही मी सुद्धा काम केले. पण, संकटाच्या काळात असा कुत्रा-मांजराचा खेळ कधी खेळला नाही. देवेंद्र फडणवीस जे करत आहेत, ते विरोधी पक्षनेत्याकडून अपेक्षित नाही', असे एकनाथ खडसे म्हणाले.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा केंद्रामुळे
यावेळी एकनाथ खडसेंनी राज्यातील रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावरुन केंद्र सरकारवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, राज्यात इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. हा तुटवडा फक्त केंद्र सरकारच्या धोरणामुळे आहे. आपले लोक संकटात असताना या इंजेक्शनची निर्यात करण्यात येत होती. ही निर्यात करण्यात आली नसती तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती. पण, आपले लोक मेले तरी चालतील पण जगात आपले नाव करण्यासाठी इंजेक्शनची निर्यात सुरू ठेवली, असा आरोप खडसेंनी केला.

बातम्या आणखी आहेत...