आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीकास्त्र:राज्यातील खताच्या तुटवडयावरून एकनाथ खडसेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले - मी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांवर अशी वेळ येऊ दिली नाही

जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
एकनाथ खडसे - फाइल फोटो - Divya Marathi
एकनाथ खडसे - फाइल फोटो
  • साठेबहाद्दरांनी साठवून केल्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण झाली, सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी

महाराष्ट्रात सध्या युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांवर ब्लॅकने खत घेण्याची वेळ आली आहे. पण जास्त पैसे देऊनही खत मिळत नाही. यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. मी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांवर अशी वेळ कधीही येऊन दिली नाही, असे म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली आहे.

सरकारचे शेतकऱ्यांकडे अतिशय दुर्लक्ष होत असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. साठेबहाद्दरांनी मोठ्या प्रमाणात युरिया साठवून ठेवल्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. सरकारने या साठेबहाद्दरांवर कठोर कारवाई करावी” अशी मागणी देखील एकनाथ खडसे यांनी केली आहे.

सरकारमध्ये कोणताही समन्वय दिसत नाही

मी कृषिमंत्री असताना एकदाही खताची टंचाई जाणवली नाही. त्यावेळी समन्वय होता. खताचा पुरवठा व्यवस्थित होत होता. आता मात्र सरकारमध्ये कोणताही समन्वय दिसत नाही, असे म्हणत खडसे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. फडणवीस सरकारच्या काळात ऑक्टोबर 2014 ते जून 2016 या दीड वर्षाच्या कालावधीत एकनाथ खडसे यांनी कृषिमंत्रीपद सांभाळले होते.

बातम्या आणखी आहेत...