आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाथाभाऊंची खेळी:एकनाथ खडसे कन्या रोहिणींसह हातावर बांधणार 'घड्याळ', सून रक्षा खडसे मात्र भाजपमध्येच राहणार

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 40 वर्षांपासून एकनाथ खडसे हे भाजपसाठी काम करत आहे. एवढ्या मोठ्या योगदानानंतर त्यांनी आता पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

भाजपचे नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती, आता ती चर्चांवर शिक्कामोर्तब झाले आहे. खडसे शुक्रवारी 23 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले. जयंत पाटील यांनी आज प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत दिली. यासोबतच एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहणी खडसे या देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र त्यांच्या सून आणि भाजप खासदार रक्षा खडसे या मात्र भाजपमध्येच राहणार आहेत.

गेल्या 40 वर्षांपासून एकनाथ खडसे हे भाजपसाठी काम करत आहे. एवढ्या मोठ्या योगदानानंतर त्यांनी आता पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. ते पक्षावर अनेक दिवसांपासून नाराज होते. त्यांनी आपली नाराजी वारंवार बोलूनही दाखवली होती. यानंतर त्यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. आता या सर्व चर्चांवर शिक्कामोर्तब झाले आहे.

दरम्यान आपल्या लेकीसह राष्ट्रवादीत प्रवेश करणारे खडसे हे सून रक्षा खडसेंना मात्र भाजपमध्येच ठेवणार आहे. यामागेही कारण आहे. आपली खासदारकी कायम ठेवण्यासाठी रक्षा खडसे या भाजपमध्येच राहणार असल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादीतून खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजे भोसले भाजपमध्ये गेले होते. मात्र, साताऱ्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने पोटनिवडणुकीत उदयनराजेंना पराभवाचा सामना करावा लागला होता. आता जळगावातही अशीच परिस्थिती आहे. जळगावमध्ये गिरीश महाजन आणि पर्यायाने भाजपचे वर्चस्व असल्यामुळे खासदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत गेल्यास पराभवाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने सूनेला भाजपत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.