आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादीचे नेेते आमदार एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे गेल्या सात वर्षांपासून अध्यक्ष असलेल्या जळगाव जिल्हा सहकारी दूध संघातील गैरकारभाराची चाैकशी हाेणार आहे. आमदार गिरीश महाजन यांनी केलेल्या मागणीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाैकशीचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार २८ जुलै राेजी तातडीने उपसचिवांकडून पाच लेखापरीक्षकांची चाैकशी समिती गठीत करण्यात आली आहे. येत्या २० ऑगस्टपर्यंत समितीला चाैकशी अहवाल सादर करण्याचे पत्र काढण्यात आले आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटत आहेत. दूध संघाच्या संचालक मंडळाची मुदत ऑगस्ट २०२०मध्ये संपली आहे. तरी संघावर खडसेंचे संचालक मंडळ असल्याने त्याला महाविकास आघाडीने मुदतवाढ दिली हाेती; परंतु राज्यात सत्तांतर झाल्यानंतर तातडीने संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. साेबतच संघातील गैरकारभाराबाबत संघाचे माजी अधिकारी एन. जे. पाटील यांनी केलेल्या तक्रारीचा संदर्भ देत चाैकशी लावण्यात आली आहे. तक्रारदार पाटील यांनी केलेल्या तक्रारीची चाैकशी व्हावी, असे पत्र आमदार गिरीश महाजन यांनी ८ जुलै राेजी शासनाला दिले आहे. त्याचा संदर्भ देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघाच्या गैरकारभाराची चाैकशी करण्याचे निर्देश दिल्यावरून उपसचिवांनी दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या आयुक्तांना चाैकशीचे पत्र दिले आहे. त्यात पाच जणांच्या चाैकशी समितीचा उल्लेख आहे.
खडसेंना धक्का...: मुख्यमंत्र्यांनी सभागृहात पहिल्याच दिवशी एकनाथ खडसेंकडून आमदार चंद्रकांत पाटील यांना त्रास दिला जात असल्याचा उल्लेख केला हाेता. साेबतच आमदार महाजन आणि आमदार खडसे यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक वाढला आहे. सत्तेचा वापर करून खडसेंनी आमदार महाजन यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माघार घेण्यास भाग पाडले हाेते. त्यामुळे आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर बँकेचा राजकीय वचपा जिल्हा दूध संघात काढण्यासाठी आमदार महाजनांनी पहिली चाल चालत खडसेंना धक्का दिल्याचे राजकीय वर्तुळात बाेलले जात आहे. आधीच्या चाैकशी संपत नाही ताेच ईडीच्या चाैकशीचे सत्र सुरू असताना खडसे कुटुंब पुन्हा चाैकशीच्या गुंत्यात खेचले गेले आहे.
चाैकशी समितीमध्ये यांचा समावेश... : मुंबई येथील विशेष लेखापरीक्षक वर्ग १ स.शा. पुरव यांच्या अध्यक्षतेखाली लेखापरीक्षक कै. माे. दवळी, आर.ई. नलावडे, याे.र. खानाेलकर आणि जु.रू. तडवी या पाच अधिकाऱ्यांच्या समितीचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.