आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसे विरुद्ध भाजप:राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यासाठीच भाजपची मनसेला साथ देत -एकनाथ खडसेंचा आरोप

जळगाव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात सध्या भोंग्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापवले जात असून भाजपकडून राज ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा मिळत आहे. हाच धागा पकडून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याच्या हेतून हा सारा प्रकार सुरू असल्याचा आरोप केला आहे. याशिवाय त्यांनी ओबीसी आरक्षण आणि फडणवीस यांच्यावरही त्यांनी भाष्य केले आहे.

ओबीसी आरक्षणावरून टीकास्त्र
राज्यात भोंगा प्रकरण तापवायचे आणि दंगल घडवायची असा विरोधकांचा डाव आहे. तर यावरून राज्यात राष्ट्रपती लावण्यासाठी भाजपचा हा डाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भोंग्यामुळे सर्वसामान्यांचे पोट भरू शकणार नाही, मात्र यामुळे राज्यात अशांतता पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. असा आरोप यावेळी खडसेंनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे, ओबीसींवर अन्याय करणारा आहे. मागच्या दाराने राजकीय आरक्षण घालवण्याचा हा प्रयत्न आहे. असे म्हणत त्यांनी भाजपवर यावरून टीका केली. तसेच चंद्रकांत पाटील आज महाविकास आघडी सरकारवर हल्ला करत असतील, पण मागच्या काळात त्यांच्या वेळीही हा प्रश्न होताच की असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

सत्ता असताना काय केले ?
भाजपची सत्ता असताना देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक ओबीसी समाजाला आरक्षणापासून दूर ठेवले होते, असा थेट आरोप आज एकनाथ खडसेंनी पुन्हा केला आहे. तर पाच वर्षात काही बोंब पाडली नाही आणि आता महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहेत, असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुका याही ओबीसी आरक्षणाविना झाल्या आहेत. त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र कोर्टाने आज पुन्हा राज्याला दणका देत ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्यास सांगितल्याने राज्यात पुन्हा हा मुद्दा तापला आहे.

बातम्या आणखी आहेत...