आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतातील विहरीतून पाणी घेतल्याच्या कारणावरुन सहा जणांनी एका 62 वर्षीय वृद्ध शेतकऱ्यास कुऱ्हाड व लोखंडी पाइपाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. 17 जून रोजी रात्री 8.30 वाजता जामनेर-बोदवड रस्त्यावर ही घटना घडली. उपचार घेऊन बरे झाल्यानंतर वृद्धाने गुरुवारी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवराम कडू कोळी (वय 62, रा. वडगाव तीघ्रे, ता. जामनेर) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. काेळी यांचे सुधाकर भगवान ब्राम्हंदे व त्यांचा मुलगा योगेश यांच्याशी शेतातील विहिरवरुन वाद झाले आहेत. त्यामुळे ब्राम्हंदे पिता-पुत्र त्यांना पाणी घेऊ देत नव्हते. दरम्यान, या प्रकरणी कोळी यांनी जामनेर तहसिलदारांकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांना पाणी देण्याचे आदेश दिले होते.
ठार मारण्याची धमकी
कोळी यांनी विहिरीतील पाणी घेतल्याचा राग आल्याने ब्राम्हंदे पिता-पुत्रासह गणेश सुधाकर ब्राम्हंदे, परमेश्वर मधुकर ब्राम्हंदे, विनोद प्रल्हाद ब्राम्हंदे व मनोज भिवसन निशानकर यांनी कोळी यांच्यावर हल्ला चढवला. कुऱ्हाडीचादांडा, लोखंडी पाइप डोक्यात मारुन त्यांना गंभीर जखमी केले. यापुढे विहिरीतील पाणी घेतले तर जीवेठार मारू, अशी धमकी दिली. या हल्ल्यात जखमी झालेल्या कोळी यांच्यावर पाच दिवसांपासून उपचार सुरू आहेत. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हेड कॉन्स्टेबल रिवाज शेख तपास करीत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.