आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरकत:दूध संघाची निवडणूक; रावेरचा साेमवारी निर्णय

जळगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत रावेर तालुका प्रतिनिधी या जागेसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जावर हरकत घेण्यात आली हाेती. ही हरकत मान्य झाल्याने तेथे जगदीश बढे हेच एकमेव उमेदवार आहेत. दरम्यान, त्यांच्या बिनविराेधचा मार्ग माेकळा असताना हरकत फेटाळेल्या उमेदवारांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील केले आहे. या अपिलावर सुनावणी झाली असून आता साेमवारी निर्णय दिला जाणार आहे.

या निर्णयात अपील मान्य केले जाते की फेटाळले जाते? यावर या मतदार संघातील निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अपील मान्य झाल्यास रावेरच्या जागेसाठी देखील मतदान हाेईल. सध्या दूध संघात भाजप-शिंदेसेनेच्या विराेधात महाविकास आघाडीचे पॅनल हाेण्याची शक्यता आहे. दाेन्ही पॅनलमध्ये लढत हाेईल असे चित्र आहे. दरम्यान, हा निकाल काय लागतो? याकडे रावेर-यावल तालुक्यासह जिल्ह्यातील महाविकास आघाडी व भाजपचे लक्ष आहे. कारण, हा निकालामुळे राजकीय आखाडे पुन्हा बदलू शकतात.

बातम्या आणखी आहेत...