आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूकीची शक्यता:माध्यमिक शिक्षक पतपेढीची निवडणूक डिसेंबरमध्ये शक्य

जळगाव6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात १२ हजार सभासद असलेल्या जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर पतपेढीची पंचवार्षिक मुदत संपलेली आहे. सहकार विभागाकडून मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू असून पुढील डिसेंबरमध्ये या पतपेढीची निवडणूक हाेण्याची शक्यता आहे. माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर नाेकरांची पतपेढी या संस्थेतील राजकारण तापले आहे. सहकार विभागाकडून निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर डिसेंबर महिन्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल. तत्पूर्वी संस्थेत आराेपांचे राजकारण गाजत आहे. पतपेढीवर केलेल्या आराेपांचे प्रकरण उपनिबंधकांकडे सुनावणीसाठी आले हाेते. पतपेढीचे सदस्य विनोद महेश्री यांनी केलेल्या तक्रारीवर मंगळवारी सुनावणी घेण्यात आली. आता २१ डिसेंबर ही सुनावणीची पुढील तारीख ठेवण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...