आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायतींसाठी मतदान:२० ग्रामपंचायतींत होणार निवडणूक, चार बिनविरोध

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील एरंडोल, पारोळा, रावेर आणि चाळीसगाव तालुक्यातील ४ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. तर २० ग्रामपंचायतींसाठी ४ ऑगस्टला मतदान होईल.

जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. एरंडोल तालुक्यातील नांदखुर्द बुद्रूक, पारोळा तालुक्यातील लोणीसीम, लोणी बुद्रूक, रावेरातील पिंप्री, मंगरुळ-जुनोने, कुसुंबा खुर्द, कुसुंबा बुद्रूक, लोहारा, पाल, मोहमांडली गट ग्रामपंचायत, निमड्या, पाडळे, जिन्सी, रणगावची निवडणूक होईल. तर अमळनेर तालुक्यातील बहादरवाडी - खोकरपाट, चाळीसगाव तालुक्यातील लोंजे, आंबेहोळ, तळेगाव, कृष्णानगर, सुंदरनगर, चिंचगव्हाण या ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.

या ग्रामपंचायती बिनविरोध
एरंडोल तालुक्यातील नांदखुर्द, पारोळा तालुक्यातील लोणी खुर्द, रावेर तालुक्यातील सहस्त्रलिंग, चाळीसगाव तालुक्यातील लोंजे या ग्रामपंचायतींची पूर्ण निवडणूक बिनविरोध झालेली आहे.

बातम्या आणखी आहेत...