आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदाेलन:वीजपुरवठा अखंडित राहणार, जिल्हाभरात 829 कंत्राटी कामगार तत्काळ सेवा देणार

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरण कंपनीच्या भांडूप परिमंडलातील कार्यक्षेत्रात अदानी इलेक्ट्रिकल्स कंपनीने वीज वितरणासाठी विद्युत नियामक आयोगाकडे परवाना मागितला आहे. त्याच्या विरोधात राज्याच्या वीज कामगार संघटनांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून तीन दिवसांच्या संप पुकारला आहे. या काळात वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळण्यासाठी महावितरण २४ तास नियंत्रण कक्ष सुरू ठेवणार आहे. या काळात एजन्सी कामगार, कंत्राटी कामगार, सेवानिवृत्त अभियंते, कर्मचारी अशा ८२९ कर्मचाऱ्यांकडून कामे करण्यात येणार असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले आहे. ३१ कर्मचारी संघटना आंदाेनात सहभागी आहेत.

संपामध्ये २८०० कर्मचारी १ समांतर वीज वितरण परवाना देण्यास सरकारच्या निर्णयाला विरोध तसेच खासगीकरण व फ्रेंचाइझीकरण रद्द करणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्या पूर्ततेसाठी हे आंदाेलन हाेत आहे. दरम्यान, या संपात जिल्ह्यातील वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता मिळून २८०० कर्मचारी या संपात सहभागी होत आहे. शांततेच्या मार्गाने आंदाेलन करण्याचे नियाेजन करण्यात आले असल्याचे कर्मचारी संघटनांकडून सांगण्यात येते आहे.

संघर्ष समितीने फिरवले मेसेज २ समाज माध्यमांवर महाराष्ट्र विद्युत कर्मचारी, अधिकारी संघर्ष समितीने मेसेज व्हायरल केले आहेत. ‘संपकाळात कुणाचं काम असेल तर ते आजचं करून घ्या. सध्या ऊस, गहू, हरभरा व अन्य पिकांना पाणी भरले जाते आहे. गैरसाेय हाेऊ नये यासाठी काळजी घ्यावी. पिण्याच्या पाण्याचे व गुराढाेरांचे नियाेजन करावे. माेबाइल चार्जिंग करून ठेवावे’ असे त्यात म्हटले आहे. त्यामुळे घराेेघरी या संपाचीच चर्चा सुरू हाेती. अनेकांनी दाेन दिवस पुरेल इतका पाणीसाठा करून ठेवला आहे.

कर्मचारी संघटना आक्रमक ३ मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना, सब ऑर्डिनेट इंजिनिअरिंग असोसिएशन, वर्कर्स फेडरेशन संघटना आदिंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कुठल्याही परिस्थितीत खासगीकरण हाेऊ देणार नाही, असा निर्धार करण्यात आला आहे. संप यशस्वीतेसाठी बैठकाही घेण्यात आल्या आहेत. संप मध्यरात्रीपासून असला तरी शहरात काही ठिकाणी मंगळवारी साडेदहा वाजताच वीज खंडित झाल्याचे चित्र समाेर आल्याने चिंता वाढली आहे.

सेवानिवृत्त अभियंता व कर्मचाऱ्यांची नेमणूक संपकाळात वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळण्यासाठी तसेच कोणतीही अडचण भासू नये यासाठी महावितरणने एजन्सी कामगार, कंत्राटी कामगार, सेवानिवृत्त अभियंते, कर्मचारी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत निरीक्षक व महाऊर्जा या विभागातील अभियंता-कर्मचारी विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी नेमण्यात आले आहे. संपकाळात ज्या एजन्सी काम करणार नाहीत अशा एजन्सींना तातडीने बडतर्फ करण्याचा निर्णय हाेईल. - राजेंद्र मार्के, प्रभारी अधीक्षक अभियंता, जळगाव

बातम्या आणखी आहेत...