आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचार प्रवचनातून व्यक्त:तप अन‌्आराधना करून आत्म्याला उन्नत करावा; चातुर्मास प्रवचनामध्ये डॉ. पदमचंद मुनी यांचे आवाहन

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकुमार असून इतके मोठे राजवैभव, आई-वडिलांचा त्याग करून आत्म्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून कसे वाचावे हे चांगल्या प्रकारे ठाऊक होते. आपणासाठी अतिमुक्तकुमार यांचे चरित्र प्रेरणादायी ठरलेले आहे. ते भगवान गौतम स्वामी, भगवान महावीर यांच्या सान्निध्यात आले आणि त्यांचे जीवन उजळले आहे, असे विचार डॉ. पदमचंद्र मुनी यांनी आपल्या प्रवचनातून व्यक्त केले.

जाणासि तं चैव न जाणासि, जं चेव न जाणासि तं चैव जाणासि हे अतिमुक्त कुमार यांनी आपल्या आई-वडिलांना सांगितले, ते एका वाक्यात सांगितले. या एका वाक्याच्या महत्त्वाला अनेक उदाहरणे देत डॉ. पदमचंद्र मुनी यांनी ‘अंतगढ दसासूत्र’ वाचनातील आज वाचन करण्यात आलेल्या वर्ग ६ व १५ व्या अध्ययनमध्ये आई-वडील आणि अतिमुक्तकुमार यांची आख्यायिका समजावून सांगितली. गुणरत्न तप, धाराधना करून अतिमुक्तकुमार विपुलाचल पर्वतावर सिद्ध झाले. त्यांनी जन्म मरणाचा फेरा टाळला. या पर्युषण पर्वामध्ये तप, आराधना करून तुम्ही आपल्या आत्म्याला उन्नत करावे असे आवाहन डॉ. पदमचंद्र मुनी यांनी उपस्थितांना प्रवचनातून केले.

बातम्या आणखी आहेत...