आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागातर्फे १७ जूनला इयत्ता दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला. मात्र गुणपत्रक मिळण्याबाबत अद्याप कोणत्याही हालचाली नसल्या तरी खान्देशात अकरावीची प्रवेशप्रक्रिया ऑफलाइन होणार असल्याने गुणपत्रकाशिवाय प्रवेश होणार नाही. मात्र, प्रवेशाला उशीर होऊ नये यासाठी शहरातील महाविद्यालयांत ऑनलाइन नावनोंदणी केली जाणार आहे.
जळगाव जिल्ह्यात अकरावी प्रवेशासाठी २१६ महाविद्यालयांत ४९ हजार ८० जागा उपलब्ध असून, यात अनुदानित महाविद्यालयांमध्ये २९ हजार ३२०, विनाअनुदानित ५२ महाविद्यालयात १६ हजार ९६० तर स्वयम् अर्थसाहाय्य असलेल्या १९ महाविद्यालयांत २८०० जागा उपलब्ध आहेत. दरम्यान, जागा कमी व विद्यार्थी संख्या अधिक असल्याने प्रवेशाची चुरस आहे.
दहावीला जिल्ह्यातील ५४ हजार विद्यार्थी उत्तीर्ण
जळगाव जिल्ह्यातील ५४ हजार ६४६ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यात ३० हजार ६७४ मुलांचा तर २३ हजार ९७२ मुलींचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांचे गुणपत्रक जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत पुढील प्रक्रिया पार पडणार नसल्याने विद्यार्थी गुणपत्रकाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने खान्देशात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाला मनाई केल्याने अडचणी वाढल्या आहे. यंदा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या व टक्का अधिक असल्याने विद्यार्थ्यात चुरस आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.