आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावीची प्रवेशप्रक्रिया ऑफलाइन:गुणपत्रक हाती पडल्यांनंतर होणार प्रत्यक्ष प्रवेश; जिल्ह्यात 216 महाविद्यालयात 49 हजार 80 जागा

जळगाव12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागातर्फे 17 जूनला इयत्ता दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला आहे. मात्र, गुणपत्रक मिळण्याबाबत अद्याप कोणत्याही हालचाली नसल्या तरी खान्देशात अकरावीची प्रवेशप्रक्रिया ही ऑफलाइन होणार असल्याने गुणपत्रकाशिवाय प्रवेश होणार नाही. मात्र प्रवेशाला उशीर होऊ नये यासाठी शहरातील महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन नावनोंदणी सुरु करण्यात येणार आहे.

जळगाव जिल्ह्यात अकरावी प्रवेशासाठी 216 महाविद्यालयांत 49 हजार 80 जागा उपलब्ध असून, यात अनुदानित महाविद्यालयांमध्ये 29 हजार 320 विना अनुदानित 52 महाविद्यालयात 16 हजार 960 तर स्वयंम अर्थसहाय्य असलेल्या 19 महाविद्यालयात 2800 जागा उपलब्ध आहे. दरम्यान, जागा कमी व विद्यार्थी संख्या अधिक असल्याने प्रवेशासाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. गुणपत्रक हाती पडल्यानंतरच प्रत्यक्षात प्रवेश प्रक्रियेला सुरवात होणार आहे. महाविद्यालयांना देखील गुणपत्रकाची प्रतीक्षा असून, विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, प्रवेशप्रक्रिया लवकरात लवकर व्हावी, यासाठी शहरातील प्रमुख महाविद्यालयांमध्ये येत्या दोन दिवसात विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. यामुळे प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यानंतर अधिक वेळ वाया जाणार नाही, असे महाविद्यालयांचे नियोजन आहे.

54 हजार विद्यार्थी प्रतीक्षेत

जळगाव जिल्ह्यातील 54 हजार 646 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहे. यात 30 हजार 674 मुलांचा तर 23 हजार 92 मुलींचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांचे गुणपत्रक जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत पुढील प्रक्रिया पार पडणार नसल्याने विद्यार्थी गुणपत्रकाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने खान्देशात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाला मनाई केल्याने अडचणी वाढल्या आहे. यंदा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या व टक्का अधिक असल्याने विद्यार्थ्यांमध्ये चुरस बघायला मिळेल.

बातम्या आणखी आहेत...