आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिषद:ओबीसींचा एम्पिरिकल डेटा जातीनिहाय संकलित करावा ; समता परिषद

जळगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केल्यानुसार शासनाने ओबीसींची माहिती संकलित करावी. आयोगाने गठीत केलेल्या समितीमार्फत ओबीसींची माहिती आडनावानुसार संकलित न करता जातीनिहाय संकलित करावी, या मागणीचे निवेदन समता परिषद युवक आघाडीने बुधवारी दिले आहे.

मागणीचे निवेदन समता परिषदेचे युवक जिल्हाध्यक्ष भूषण महाजन यांच्या नेतृत्वात देण्यात आले. कार्याध्यक्ष वसंत पाटील, बारा बलुतेदार संघाचे मुकुंद मेटकर, लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे, छावा संघटनेचे अमोल कोल्हे, जिल्हा सरचिटणीस नितीन महाजन, महानगराध्यक्ष हेमरत्न काळुंखे, भारती काळे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...