आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगार:फॅशन डिझाइनिंगच्या विद्यार्थिनींना एक हजार झेंडे शिलाईतून रोजगार

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत घराेघरी तिरंगा फडकवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने झेंड्यांची मागणी वाढली आहे. बेंडाळे महाविद्यालयाने तिरंगा शिवण्याचा उपक्रम सुरू करून विद्यार्थिनींना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

बेंडाळे महाविद्यालयाने सुरत येथून तिरंगाचा तागा खरेदी केला आहे. महाविद्यालयातील फॅशन डिझाइनिंगचा कोर्स करणाऱ्या १५ विद्यार्थिनी झेंडे शिवून देत आहेत. प्रत्येक झेंड्यामागे विद्यार्थिनींना दोन रुपये दिले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात एक हजार झेंडे शिवण्याचे नियाेजन आहे. तयार झेंडे शक्यतोवर शैक्षणिक संस्थांना विक्री केले जातील. प्राचार्या डॉ. गौरी राणे यांनी पुढाकार घेऊन प्राध्यापक, प्राचार्य संघटनांना महाविद्यालयात तयार होणारे झेंडे खरेदी करण्याचे आवाहन केले. ३० बाय २० इंच आकाराचा आकर्षक झेंडा तयार केला जातो आहे. एक झेंड्यांची किंमत २५ रुपये आहे. विक्रीसाठी महाविद्यालयात स्टॉल लावला जाणार आहे. मागणी वाढल्यास आणखी झेंडे तयार करण्यात येतील, अशी माहिती प्राचार्या डॉ. राणे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...