आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे यंदाच्या २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.
विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे, वाणिज्य व व्यवस्थापन, संगणकशास्त्र, विज्ञान व तंत्रज्ञान, निरंतर शिक्षण, आरोग्यविज्ञान, शिक्षणशास्त्र या शिक्षणक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू केली आहे. अधिक माहितीसाठी www.ycmou.ac.in किंवा www.ycmoudigitaluniversity.ac या संकेतस्थळावर भेट द्यावी.
या रोजगार विषयक अभ्यासक्रमांचाही आहे समावेश
मानव्य विद्या व सामाजिक शास्त्रे शाखेत मराठी, उर्दू बी.ए.सह हिंदी, मराठी, उर्दू, इंग्रजी, ग्रंथालय व माहितीशास्त्र, अर्थशास्त्र, लोकप्रशासन या विषयात एम.ए. करता येईल. वाणिज्य शाखेत एम.कॉम, एम.बी.ए., बी.कॉम, बीबीए तर विज्ञान शाखेत बीएस्सीसह एमएस्सीचे शिक्षणक्रम उपलब्ध आहेत. याशिवाय पाणी व्यवस्थापन, बांधकाम पर्यवेक्षक, सलून, टेलरिंग, छायाचित्रण, व्हिडिओ निर्मिती, पटकथा लेखन, सुरक्षारक्षक, ग्रामरोजगार सेवक, शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन, पालीभाषा, सहकार, पर्यावरण, शालेय व्यवस्थापन, घर कामगार कौशल्य असे पदविका, प्रमाणपत्र उपलब्ध आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.