आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छता अभियान:२० दुकानांचे अतिक्रमण हटवले; चाळीसगावात नदीच्या साफसफाई नंतर  नदीपात्रातील अतिक्रमणांवर बुलडोझर

चाळीसगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तितूर व डोंगरी नदीच्या साफसफाई मोहिमेनंतर आता नगरपालिकेने नदीपात्रातील अतिक्रमणावर कारवाईचा बडगा उगारला आहे. गुरुवारी जुन्या पालिकेकडे जाणाऱ्या भाजी मंडई पुलावरील २० दुकानांवर पालिकेने बुलडोझर चालवत पुल तसेच नदीपात्र मोकळे केले. या वेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात कहोता. पालिकेची ही मोहीम शुक्रवारीही सुरू राहणार असून दुसऱ्या टप्प्यात शहरातील नदीपात्रासह नागद रोड भागातील अतिक्रमण काढले जाणार आहे. नदीतील अतिक्रमण काढण्यास सुरूवात झाल्याने शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.

गतवर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे शहरातून वाहणाऱ्या डोंगरी व तितूर नदीला तब्बल सात पुर आले होते. त्यात पहिल्याच पुरात शहर व परिसरातील जवळपास २ हजार ५०० घरे, झोपड्या, दुकाने, गोठा-शेड यांचे नुकसान झाले होते. तर पाचव्या पुरात नदी किनाऱ्यालगतची २०० दुकाने व घरे वाहून गेल्याने अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे गेल्यावर्षी सारखी आपत्ती यंदाही ओढावू नये, यासाठी प्रशासन सर्तक झाले आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने तितूर व डोंगरी नदीच्या स्वच्छतेसाठी लोकसहभागाचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मिशन ५०० कोटी लिटर जलसाठा चमूच्या पुढाकारातून व सामाजिक संस्था तसेच उद्योजकांच्या लोकसहभागातून तितूर व डोंगरी नदीची साफसफाई करण्यात आली. महिनाभर मोहिम राबवून नदीपात्रातून तब्बल १ हजार ४०० डंपर गाळ काढण्यात आला.

अतिक्रमणधारकांची धावपळ
पालिकेने नदी पात्रातील व काठावरील अतिक्रमण काढण्यास गुरुवारी सुरूवात केली. दुपारी भाजी मंडई पुलावरील जवळपास २० छाेटी, माेठी दुकाने व टपऱ्यांचे अतिक्रमण दोन जेसीबी व पोकलेन यंत्राच्या सहाय्याने काढण्यात आले. काही दुकानदारांनी भाजी मंडई पुलावर नदीपात्रात मातीचा भराव करून दुकाने थाटली होती. काहींनी तर थेट शेड उभारून व्यवसाय सुरु केले होते. नदीच्या पाण्याला अडथळा ठरतील, असे दुकाने हटवण्यात आले. पालिकेचा ताफा येताना दिसताच अतिक्रमणधारकांची धावपळ उडाल्याचे दिसून आले. काहींनी स्वत: अतिक्रमण काढले.

पालिकेसह पोलिसांचा चोख बंदोबस्त
पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे बांधकाम अभियंता प्रदीप धनके, दीपक देशमुख, प्रेमसिंग राजपूत, भूषण लाटे, आरोग्य निरीक्षक संजय गोयर, दिलीप चौधरी यांच्यासह पालिकेचे १५० अधिकारी व कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले होते. या वेळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्यासह १५ कर्मचारी व अधिकारी यांचा बंदोबस्त होता. शहर वाहतूक शाखेचे एपीअाय तुषार देवरे व वाहतूक कर्मचारीही वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपस्थित होते.

महिन्यापूर्वी २१० जणांना दिली नोटीस
गेल्यावर्षासारखीच पुराची आपत्ती ओढावून हानी होवू नये, म्हणून पालिकेने सतर्क होत नदीपात्र परिसरातील अतिक्रमण करून राहत असलेले नागरिक, व्यावसायिक, टपऱ्या व छोटे दुकानदार अशा २१० अतिक्रमण धारकांना नोटीस बजावल्या होत्या. अनधिकृत अतिक्रमण केलेली नदी किनाऱ्यालगतच्या जागा ही नोटीस मिळताच तीन दिवसात खाली करावी. तसे न केल्यास हे अतिक्रमण काढून जागा रिकामी करुन कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पालिकेने बजावले होते.

बातम्या आणखी आहेत...