आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:शाहूनगरातील वर्षानुवर्षे बंदिस्त गटारींवरील अतिक्रमण ताेडणार

जळगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहूनगरातील गटारींवर बांधण्यात आलेल्या आेट्यांमुळे साफसफाईचा माेठा प्रश्न निर्माण झाला आहे. तुंबलेल्या गटारींमुळे रस्त्यावरून सांडपाणी वाहत असल्याच्या तक्रारी ‘दिव्य मराठी’च्या रुबरू कार्यक्रमात करण्यात आल्या हाेत्या. त्याची दखल घेत मनपा प्रशासनाने गटारींवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला आहे.

शाहूनगरातील गल्लीबाेळात गटारींची साफसफाई वर्षानुवर्षे झालेली नाही. त्यामुळे रहिवाशांना दुर्गंधी, अस्वच्छता व डासांच्या उपद्रव सहन करावा लागत आहे. महापालिकेच्या आराेग्य यंत्रणेकडून नियमित साफसफाई हाेत नाही अशी आेरड हाेत हाेती. यासंदर्भात मनपाच्या आराेग्य, बांधकाम व अतिक्रमण पथकाने बुधवारी प्रत्यक्ष पाहणी केली. यात मुख्य रस्त्यालगत बांधलेल्या गटारींवर ढापे टाकून बंदिस्त करण्यात आले आहेत. तर शाहूनगरातील ताज पान सेंटरच्या परिसरातील गटारींवर अतिक्रमण असल्याचे स्वच्छता करणे शक्य हाेत नाही.

मनपाकडून रहिवाशांना ताकीद
शाहूनगरातील अस्वच्छतेचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी गटारी माेकळ्या करणे गरजेचे आहे. त्यामुळे अतिक्रमण विभागाचे अधीक्षक उमाकांत नष्टे, लिपिक संजय पवार यांच्यासह पथकाने ४० पेक्षा जास्त रहिवाशांना अतिक्रमण काढून घेण्याची ताकीद दिली आहे. साेमवारी जेसीबीने हे बांधकाम ताेडले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...