आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा:अभियांत्रिकीसह व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा मार्चमध्ये

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तंत्रशिक्षण संचालनालयाकडून प्रवेश प्रक्रियेस होत असलेल्या उशिरामुळे यंदा अभियांत्रिकी, लॉ व फार्मसीच्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू आहे. त्यामुळे प्रथम वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फर्स्ट सेमिस्टरला अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळणार नव्हता. दरम्यान, प्रवेश पुर्ण झाल्यानंतर तीन महिन्यांनी परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

परीक्षेचे शेड्यूल बदलले

सध्या अभियांत्रिकीसह लॉ, फार्मसीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. डिसेंबर अखेरीस ही प्रवेश प्रकिया पुर्ण होईल. तसेच अडीच महिने उशिराने प्रक्रिया पुढे सरकते आहे. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसह अभियांत्रिकीच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील दिलासा मिळाला आहे. या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे शेड्यूल देखील बदलले आहे.

विद्यार्थ्यांना अभ्यासाठी मिळणार वेळ

थेअरी व प्रात्याक्षीक असा दुहेरी अभ्यास करण्यासाठी आता पुरेसा वेळ मिळणार आहे. विद्यापीठाने दिलासा दिला नसता तर कदाचित विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अत्यंत कमी वेळ मिळाला असता. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे.

विद्यापीठाने केला पाठपुरावा

दरम्यान, स्वायत्त असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने हा निर्णय विद्यापीठाच्या आधीच घेतला आहे. नव्याने प्रवेश घेणाऱ्या तसेच अभियांत्रिकीच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा या मागणीसाठी काही विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाकडे पाठपुरावा देखील केला होता.

इतर शाखांच्या हिवाळी परीक्षा याच महिन्यात

दरम्यान, विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, आंतर विद्याशाखीय अभ्यास या विद्याशाखेंतर्गत शिकवल्या जाणाऱ्या सर्व अभ्याक्रमांच्या हिवाळी परीक्षा नोव्हेंबर 2022 ते जानेवारी 2023 दरम्यान होणार आहे. या परीक्षांचे अर्ज सादर करण्यावे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत दर्शवण्यात आली आहे.

विद्यार्थी हिताचा विचार करुन मार्चमध्ये परीक्षा

प्रवेश प्रक्रिया लांबलेली असल्यामुळे नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना किमान तीन महिने अभ्यासासाठी दिले जाणार आहे. विद्यार्थी हिताचा विचार करुन विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.

-प्रा. दीपक दलाल, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक

बातम्या आणखी आहेत...