आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र आणि बी. एस्सी. (कृषी) या व्यावसायिक शाखांतील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएच-सीईटी परीक्षा आजपासून (९ मे) सुरू होते आहे.
यंदा पहिल्यांदाच सकाळी ७.३० वाजता पेपर होणार आहे. तापमान जास्त असल्याने सकाळीच पेपर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कधी होणार परीक्षा?
९ ते १४ मे दरम्यान दरराेज दाेन सत्रात हाेईल परीक्षा शहरातील जी. एस. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, केसीई अभियांत्रिकी महाविद्यालय व पाळधी येथील एसएस सिस्टिम्स येथे ९ ते १४ मे दरम्यान दररोज दोन सत्रात ही परीक्षा घेण्यात येणार आहे. ८,९५८ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठीचे अर्ज भरलेले आहेत.
कसा आहे अभ्यासक्रम?
सीईटी सेलतर्फे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या करिता नवीन वर्षात २०२३मध्ये होणाऱ्या प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम प्रसिद्ध करण्यात आला होता. २० टक्के प्रश्न अकरावीच्या अभ्यासक्रमावर तर उर्वरित ८० टक्के प्रश्न बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे, जेईई मेन्स व नीट परीक्षांच्या स्तराइतकी काठिण्य पातळी एमएच सीईटी परीक्षेला असणार आहे.
८,९५८ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. बदलत्या स्वरूपामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने तयारी करावी लागली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासाचे नियोजन करता यावे, या उद्देशाने सीईटी सेलतर्फे अभ्यासक्रमाचा तपशील आधीच प्रसिद्ध केला होता.
अंतर्गत प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांबाबतची माहिती नमूद केलेली आहे. त्यानुसार २० टक्के प्रश्न हे इयत्ता अकरावीच्या अभ्यासक्रमावार आधारित असतील. तर ८० टक्के प्रश्न बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत.
प्रश्नांची काठीण्य पातळी वाढणार
प्रश्नांची काठिण्य पातळी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) विषयाकरिता जेईई (मेन्स) आणि जीवशास्त्र विषयाकरिता नीट परीक्षेच्या काठिण्य पातळी इतकीच असणार आहे. इयत्ता बारावीशी निगडित प्रश्न हे संपूर्ण अभ्यासक्रमातून विचारले जातील. तर अकरावीसाठी विषयनिहाय धडे निश्चित करण्यात आले आहेत. काठिण्य पातळी वाढवल्यानंतर ही पहिली परीक्षा होते आहे.
अशी होईल परीक्षा : तिन्ही पेपरला प्रत्येकी ९० मिनिटे
एमएचटी-सीईटी या प्रवेश परीक्षेसाठी तीन पेपर असतील. प्रत्येकी १०० गुणांसाठीच्या तीन प्रश्नपत्रिका असतील. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नांचा (एमसीक्यू) समावेश असेल. महत्त्वाचे म्हणजे चुकीच्या उत्तरासाठी गुणकपात (निगेटिव्ह मार्किंग) राहणार नाही. हे दिलासादायक अाहे. गणितासाठी ५० प्रश्न (१० प्रश्न अकरावी, ४० प्रश्न बारावी अभ्यासक्रमाचे) प्रत्येकी दोन गुणांसाठी विचारले जातील. पेपर क्रमांक दोनमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयांकरिता प्रत्येकी एक गुणासाठी ५० प्रश्न विचारले जातील.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.