आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:अभियंत्यांनो, ‘पेव्हींग ब्लॉकक’चे प्रस्ताव आणू नका; प्रत्यक्ष ब्लॉककची कामे तपासून बिलांच्या रकमांमध्ये केली कपात

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रस्त्यांच्या कामात सर्वाधिक नफा मिळवून देणाऱ्या पेव्हींग ब्लॉककच्या कामांना यापुढे बंदी घालण्यात आली आहे. शहरात तपासणीदरम्यान भार सोसण्याची क्षमता नसलेले पेव्हींग ब्लॉकक वापरण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आगामी काळात रस्त्यांसाठी पेव्हींग ब्लॉककऐवजी काँक्रीटच्या रस्त्यांसाठी अंदाजपत्रक सादर करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी दिले आहेत. शहरात आमदार निधी तसेच शासनाच्या वेगवेगळ्या निधीतून विकास कामे मंजूर आहेत. त्यात बहुसंख्य भागात रस्त्यांवर तसेच ओपन स्पेसमध्ये पेव्हींग ब्लॉकक बसवण्याच्या कामांना यापुर्वीच मंजुरी मिळाली आहे. कामे पूर्ण झाल्याने बिल अदा करण्यापूर्वी त्याच्या गुणवत्तेची तपासणीची मोहिम आयुक्त विद्या गायकवाड यांनी हाती घेतली आहे. त्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवरील वर्दळीचा विचार न करता तसेच अंदाजपत्रकाशिवाय पेव्हींग ब्लॉककचा वापर न केल्याचे समोर आले आहे. यामुळे भविष्यात वाहनांचा भार सांभाळण्याची क्षमता नसलेल्या पेव्हींग ब्लॉककच्या रस्त्यांची परिस्थिती खराब होऊ शकते. आयुक्तांनी केलेल्या सात कामांच्या पाहणीत जान्हवी हॉटेलच्या मागील भागातील गणपती मंदिराच्या परिसरातील तसेच पिंप्राळा परिसरातील अष्टभुजा मंदिराजवळील रस्त्यांच्या बिलाच्या रकमेत कपात करण्याचे आदेश दिले आहेत. अभियंत्यांनो, ‘पेव्हींग ब्लॉकक’चे प्रस्ताव ... पाणी न झिरपण्याची समस्या : पेव्हींग ब्लॉककच्या कामात काँक्रीटच्या तुलनेत अधिक नफा मिळत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळेच लोकप्रतिनिधींना हाताशी धरून मक्तेदार रस्त्यांसाठी तसेच ओपन स्पेसमध्ये संपूर्ण परिसर पेव्हींग ब्लॉककने व्यापण्याची कामे मिळवतात. परंतु, शहरातील अनेक भागात ओपन स्पेसमधील पेव्हींग ब्लॉककमुळे पावसाचे पाणी जमिनीत झिरपत नसल्याची समस्या पुढे आली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. शहर अभियंत्यांना जबाबदार धरणार : काँक्रीटला पर्याय म्हणून वापरण्यात येणाऱ्या पेव्हींग ब्लॉककच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी काळात रस्त्यांच्या कामासाठी अंदाजपत्रक तयार करताना पेव्हींग ब्लॉककऐवजी काँक्रीट रस्ते तयार करण्याचे अंदाजपत्रक सादर करावे. त्यानंतरही पेव्हींग ब्लॉककचे अंदाजपत्रक सादर केल्यास महापालिकेच्या शहर अभियंता तसेच संबंधित कनिष्ठ अभियंता यांना जबाबदार धरण्यात येणार आहे. याशिवाय महापालिकेच्या आयुक्तांच्या आदेशाचा अवमान केल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...