आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्रजी शाळा:सत्तेसाठी फोडाफोडी तशीच इंग्रजी शाळेची मुले मराठीकडे वळवावी

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सत्तेसाठी आमदार फोडले जातात तसे इंग्रजी शाळेतील मुले मराठीकडे वळवण्याची वेळ आली आहे. परिपूर्ण बदलांमुळे पालकही मुलांना या शाळांमध्ये टाकत आहेत. विधानसभेतील २८८ आमदारांपैकी बहुतांश आमदार शुगर, बी.पी. वाले आहेत मात्र शिक्षक संयमी व समाधानी असल्याने ते पूर्ण निरोगी असून कुठेही भरकटलेले नाहीत. शिक्षकांनी ज्ञानदानाचे कार्य सुरू ठेवावे, शासन त्यांना सर्वतोपरी मदत करेल, असा विश्वास पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

सोमवारी शिक्षक दिनानिमित्त छत्रपती संभाजीराजे सभागृहात शिक्षक पुरस्कार वितरणावेळी ते बोलत होते. यावेळी तीन वर्षांतील ४८ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

जिल्हा परिषदेने विविध उपक्रम राबवून प्राथमिक शिक्षणाचा चेहरा बदलवण्याचा प्रयत्न केला. यात शिक्षकांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. इंग्रजी माध्यमाच्या जमान्यात मराठी शाळा आपले अस्तित्व टिकवून आहेत. आज सर्व क्षेत्रात भ्रष्टाचार आहे, मात्र शिक्षक याला अपवाद असल्याचे मंत्री पाटील म्हणालेे. मराठी माध्यमाची पटसंख्या वाढली आहे. १६ कलमी कार्यक्रमाच्या माध्यमातून हा बदल होत आहे. जिल्ह्यातून १७ शाळांची मॉडेल स्कूलमध्ये निवड झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. जि.प. प्रशासनाने १६ कलमी कार्यक्रम राबवल्याबद्दल सीईओ डॉ. पंकज आशिया यांचा विशेष सन्मान केला. आमदार शिरीष चौधरी, आमदार सुरेश भोळे, डाॅ. सुधीर तांबे उपस्थित होते.

शिक्षकांचे अनेक प्रश्न शासनाकडे प्रलंबित
शिक्षकांकडून व शिक्षण विभागात अनेक चुकीचे कामे होतात, शिक्षकांचे अनेक प्रश्न शासनाकडे पडून आहेत मात्र याकडे लक्ष दिले जात नाही. जिल्ह्यातील मंत्र्यांनी या विषयाकडे लक्ष घालावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...