आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबालगंधर्व स्मृतिदिनानिमित्ताने ‘नाट्य संगीत रजनी’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजन करण्यात आले होते. यात शास्त्रीय-उपशास्त्रीय नाट्यसंगीताने रसिकांच्या मनात चांदणे फुलवले. ‘मानापमान’ नाटकातील’ नमन नटवरा विस्मयककारा’ या नांदीने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
बालगंधर्व स्मृतिदिनानिमित्ताने शनिवारी सायंकाळी ७ वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात नाट्यसंगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. यात कलाकार प्राजक्ता काकतकर व ओंकार प्रभुघाटे यांनी भास्करबुवा बखले, अण्णासाहेब किर्लोस्कर, पंडित अभिषेकी यांच्या संगीत स्वयंवर, संगीत सौभद्र आदी अनेक नाटकांतील विविध नाट्यपदे सादर करत रसिकांची दाद मिळवत कार्यक्रमात रंगत वाढवली. यात ‘संगीत स्वयंवर’ नाटकातील ‘नाथ हा माझा’ हे अजरामर नाट्यपद सादर करून सांस्कृतिक मैफलीत रसिकांची दाद मिळवली. भास्करबुवा बखलेंचे संगीत स्वयंवरातील नाट्यपदाने बालगंधर्वांचे स्मरण करून दिले. नाट्यपदांच्या माध्यमातून सुरांची मैफल रंगत गेली. गायक कलाकार प्राजक्ता काकतकर, ओंकार प्रभुघाटे यांना धनंजय पुराणिक यांनी तबल्यावर तर मकरंद कुंडले यांनी ऑर्गनवर साथ दिली. संकल्पना व सादरीकरण स्व.वसंतराव चांदोरकर स्मृतिप्रतिष्ठाने केले होते. मयूर पाटील यांनी गुरू वंदना सादर केली. दीपप्रज्वलन उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, डॉ. अनुराधा राऊत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, कलाकार प्राजक्ता काकतकर व ओंकार प्रभुघाटे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी दीपक चांदोरकर व दीपिका चांदोरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन दीप्ती भागवत यांनी केले.
या नाट्यपदांनी आणली रंगत
नाट्य संगीत रजनीत विविध गाजलेल्या संगीत नाटकांची पदे सादर करण्यात आली. यात ‘नमन नटवरा विस्मयकारा’ या नांदीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ‘नाथ हा माझा, मम आत्मा रमला, बहुत दिन नच भेटलो सुंदरी अशी नाट्यपदे सादर करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.