आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे नवउद्योजकांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी अावश्यक असलेले उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन नाशिक येथे करण्यात आले आहे. २३ मे २०२३ ते २ जून २०२३ या कालावधीत हे प्रशिक्षण दिले जाणार अाहे.
एका बॅचसाठी ४० जागांची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. उद्योग उभारणीतील विविध टप्पे, प्रकल्प अहवाल, विविध व्यावसायिक नोंदणी व परवाने, शासनाच्या कर्ज योजना व अनुदानाबाबत सविस्तर माहिती, उद्योग व्यवसायाच्या कामासाठी कुठे संपर्क साधावा, यशस्वी उद्योजकांचे मनोगत या बाबींचा अंतर्भाव असेल.
व्यवसायिकांना चालना
शासकीय कर्ज योजनांच्या लाभासाठी प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक आहे. स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय सुरू करावा, या प्रमुख उद्देशाने हा प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे असावे. २२ मे पूर्वीच आपला प्रवेश निश्चित करावा. त्यासाठी सातपूर अायटीअायजवळील उद्योग भवन इमारतीतील प्रकल्प आधिकारी, एमसीइडी नाशिक विभाग या कार्यालयात संपर्क करावा. अथवा ८८८८०८२८११ या क्रमांकावरही संपर्क करता येईल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.