आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्ताह:विद्यापीठात पर्यावरण जनजागृती सप्ताह ; उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा राष्ट्रीय सेवा योजना कक्ष

जळगाव20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पर्यावरण जनजागृती आणि स्वच्छता सप्ताह राबवण्यात येतो आहे. यात पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि सहायक कार्यक्रम सल्लागार रासेयो संचालनालय नवी दिल्ली यांच्या आदेशाने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. ७ ते १३ जून या कालावधीत पर्यावरण जनजागृती व स्वच्छता सप्ताह पाळला जातो आहे. शुक्रवारी रासेयोच्या स्वंयसेवकांनी संगणकशास्त्र प्रशाळा, शिक्षणशास्त्र विभाग, आजीवन अध्‍ययन विस्तार सेवा विभाग, सामाजिकशास्त्र प्रशाळा, गणित प्रशाळा या परिसरातील प्लास्टीक व कचरा वेचला. रासेयोच्या वतीने पथनाटय तसेच प्रत्येक गावात ग्रीन क्ल्ब निर्माण केले जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता केली जाणार आहे अशी माहिती रासेयोचे संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...